पत्नीच्या प्रियकराचा केला पतीने हातोड्याने खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:41 PM2018-12-03T23:41:27+5:302018-12-03T23:41:47+5:30

आपल्या घरात पत्नीसोबत तीचा प्रियकर विशाल विलास भोईर यास पाहिल्या नंतर राग अनावर झालेल्या तिच्या पतीने त्याच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून त्याची हत्या केली.

Wife's lover killed Hussein Hood | पत्नीच्या प्रियकराचा केला पतीने हातोड्याने खून

पत्नीच्या प्रियकराचा केला पतीने हातोड्याने खून

Next

पालघर : आपल्या घरात पत्नीसोबत तीचा प्रियकर विशाल विलास भोईर यास पाहिल्या नंतर राग अनावर झालेल्या तिच्या पतीने त्याच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून त्याची हत्या केली. पळून गेलेल्या आरोपीस पालघर पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.
पालघरच्या ढुंगी पाडा येथे आरोपी विजय विष्णू लाडे हा आपल्या पत्नी सोबत भाडयाच्या घरात राहत होता.गवंडी काम करणाº्या विजयला दोन मुले असून शेजारी राहणाऱ्या मृत विशाल भोईर सोबत त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. त्याच्या सोबत ती अनेक वेळा घर सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आपल्या मुलाच्या भविष्यासाठी तो आपल्या पत्नीची समजूत काढून तिला नांदवीत होता. मात्र ह्या प्रकारणावरु न नेहमीच वादावादी होत असल्याने आरोपी लाडे ने ढुंगीपाडा येथील खोली सोडून धनसार येथे एक खोली भाड्याने घेतली. रविवारी विष्णू लाडे कामावरून घरी आला असतांना आपल्या घरात पत्नी सोबत त्याने भोईर ह्यास पाहिले. आणि त्याचा राग अनावर झाला ह्यावेळी झालेल्या बाचाबाची नंतर संतप्त झालेल्या आरोपीने घरातील हाथोडीने त्याच्या डोक्यात जोरदार फटके मारून त्याचा खून केला. नंतर त्याने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून पलायन केले. जखमीला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे ह्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पालघर रेल्वे स्टेशन वर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीस अटक केली. त्याच्याविरोधात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Wife's lover killed Hussein Hood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.