उधव्यातील अतिक्रमणे हटविणार
By admin | Published: December 24, 2016 02:33 AM2016-12-24T02:33:15+5:302016-12-24T02:33:15+5:30
तालुक्यातील उधवा गावातील अतिक्रमणे हटविण्याचा ठराव गुरूवारी झालेल्या ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला,
तलासरी : तालुक्यातील उधवा गावातील अतिक्रमणे हटविण्याचा ठराव गुरूवारी झालेल्या ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला, उधवा तलासरी राज्यमार्ग, खानाविल रोड, कोदाड रस्ता या ठिकाणी रस्ता लगत मोठया प्रमाणात अतिक्र मणे झाल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होत असतात. अतिक्र मणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्याबाबत वारंवार तक्र ारी झाल्याने ही रस्ता लगतची अतिक्र मणे हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
गुरूवारी झालेल्या या ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामसभेत प्रधान मंत्री आवास योजनेचे वाचन करण्यात आल. तसेच नागरी सुविधा आराखडा मंजूर करण्यात आला. रोजगार सेवक नेमणूक करणे, पेसा गाव जाहीर झाल्याने पंचायत क्षेत्र विस्तार कायद्याच्या अंमलबजावणी बाबत ग्रामसभेत चर्चा करण्यात आली
उधव्यातील ग्रामस्थ रोजगारसाठी स्थलांतर करतात या साठी मजुरांना गावातच मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची प्रभावी अमलबजावणी करण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले. उधवा गावातील कचऱ्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात आलाआहे. घंटागाडीने गोळा केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर मध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावली जाते स्वच्छ भारत मिशन प्रभावी राबविले जाते. (वार्ताहर)