विक्रमगडमध्ये मुसळणार, अनेक पूल पाण्याखाली
By admin | Published: July 16, 2017 02:16 AM2017-07-16T02:16:53+5:302017-07-16T02:16:53+5:30
गेल्या दोन दिवसांपासून विक्रमगड व परिसरात पावसाचा जोर कायम असून आज दिवसभरात विक्रमगडात ११० तर तलवाडा ६० मि़ मि पाऊस झाला. तालुक्यातील कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : गेल्या दोन दिवसांपासून विक्रमगड व परिसरात पावसाचा जोर कायम असून आज दिवसभरात विक्रमगडात ११० तर तलवाडा ६० मि़ मि पाऊस झाला. तालुक्यातील कमी उंची असलेल्या पुलांवरुन गुडघ्या एवढे पाणी वाहू लागले होते़ त्यामुळे आलोंंडा, ओंदे, जुना साखरा पूल, जुना आंबेघर पूल आदीपाण्याखाली होते़ तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते़ याचा परिणाम सकाळच्या सुमारस काही काळी झाल्याने सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली होती. एस़ टी़ महामंडळाच्या बसेस एका बाजूला थांबून होत्या़ तर खाजगी वाहनेही ठप्प होती. त्यामुळे चाकरमान्यांची व कामासाठी बाहेरगावी जाणा-याची मोठी पंचाईत झाली होती़ शेतामध्ये प्रचंड पाणी तुंबल्याने आवणी करण्यात अडचण निर्माण झाली होती तर रोपणी केलेले भात पाण्याखाली असल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे़ पुलावरुन वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी रहिवाशांनी गर्दी केली होती़
बळीराजा मात्र आता तुझा वर्षाव थांबव रे बाबा अशी आळवणी वरूणराजाला करीत आहे. जर पाऊस थांबला नाही तर शेतात घेतलेली सर्व मेहनत वाया जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत.