सफाळे वैतरणा पूल खचणार?

By admin | Published: June 1, 2016 02:22 AM2016-06-01T02:22:01+5:302016-06-01T02:22:01+5:30

सफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने

Will Vikhala bridge stand out? | सफाळे वैतरणा पूल खचणार?

सफाळे वैतरणा पूल खचणार?

Next

हितेन नाईक,  पालघर
सफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अत्यंत धोकादायक अवस्थेतील हे रेती उत्खनन जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच रोखले नाही तर रेल्वे पूल खचून एखाद्या रेल्वेला अपघात घडल्यास मोठी प्राणहानी घडू शकते.
पालघर जिल्हयात अनेक नदीपात्राच्या खाडीमध्ये रेती उत्खननाला बंदी असून फार कमी ठिकाणी रेती परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे रेतीची टंचाई भासत असुन असल्याने मोठया प्रमाणात चोरटया पध्दतीने रेती उत्खनन वाहतूक सुरू आहे. सतत रेतीच्या मागणी वाढत असल्याने अत्यंत धोकादायक पध्दतीने बेकायदेशीररित्या नदी, नाले, खाडी, समुद्रातून रेती उत्खनन सुरू आहे.
सफाळे वैतरणा दरम्यानच्या वैतरणा खाडीवरील पुलावरून मुंबईकडे गुजरात, दिल्ली इ. ठिकाणी पश्चिम मध्य व उत्तर रेल्वेच्या २५० ट्रेन्स रोज जातात.
हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षापूर्वी बांधण्यात आला असून सुमारे ४५० ते ५०० गाडयांच्या फेऱ्यामुळे व
समुद्राच्या खारट हवा,पाणी हयामुळे तो काही प्रमाणात कमकुवत बनल्याने नुकतीच त्याच्या व रुळांच्या दुरूस्तीसाठी जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.
वैतरणा खाडीवर दोन पूल असून हया पुलाच्या दोनशे ते तीनशे मिटरच्या अंतरावर दिवसा ढवळया रेती उत्खनन चालू असून हा पूल खचल्यास त्यावरून जाणाऱ्या एखाद्या प्रवासी ट्रेनला अपघात झाल्यास मोठया प्रमाणात जीवीतहानीला सामोरे जाण्याची भीती वाढीव - सरावली, वैतीपाडातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाढीव-वैतीपाडा हे वैतरणा खाडीमध्ये वसलेले एक बेट असून या बेटावर दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. चोही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटाला भरतीचा मोठा धोका असून पाणी गावात व शेतात शिरू नये म्हणून गावांच्या बाजूने खारभूमी विभागाने एक संरक्षक बंधारा बांधून दिला आहे.परंतु, हया बंधाऱ्या लगतच वाढीव वैतीपाडा इ. भागातील काही मूठभर स्वार्थी लोक रेती उत्खनन करतात तर काही रेती उत्खनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. यामुळे खारभूमीच्या बंधाऱ्याची झीज होउन काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. परिणामी गावातील सुमारे २०० एकर शेतजमीन नापीक बनली आहे. विहीर, बोअरवेलचे पाणी खारट बनले आहे.

Web Title: Will Vikhala bridge stand out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.