विवेक पंडित आज सुटणार?
By admin | Published: May 3, 2017 05:11 AM2017-05-03T05:11:41+5:302017-05-03T05:11:41+5:30
मुख्यमंत्री आणि श्रमजीवीच्या अध्यक्षा विद्युलता पंडित ह्यांच्या मध्ये झालेल्या यशस्वी चर्चे नंतर आज श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक
पालघर : मुख्यमंत्री आणि श्रमजीवीच्या अध्यक्षा विद्युलता पंडित ह्यांच्या मध्ये झालेल्या यशस्वी चर्चे नंतर आज श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित व कार्यकर्त्यांची पालघर न्यायालयात जामीन घेण्याची प्रक्रि या पूर्ण झाल्याने उद्या त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित व त्यांच्या ३७ कार्यकर्त्यांना सरकारी कामकाजात अडथळा व अन्य आरोपाखाली जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांच्या तक्र ारी नंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने न्यायालयाने त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यांच्या अटकेचे पडसाद पूर्ण जिल्ह्यात उमटले होते.तर जिल्हापरिषद व पंचायत समिती मधील अधिकारी,कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी काम बंद आंदोलन केले होते. या वादात सर्वसामान्यांची कामे रखडली जात जिल्ह्याच्या विकास कामांना मात्र खीळ बसली होती.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवींच्या अध्यक्षा विद्युलता पंडित व अन्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागितली होती. मुख्यमंत्र्यांच्या या भेटी दरम्यान विवेक पंडित व सहकाऱ्यांनी प्रथम जामीन देऊन बाहेर यावे त्यानंतर या प्रकरणी त्यांच्याशी सविस्तर चर्चा व चौकशी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी या शिष्टमंडळास दिले होते त्यानुसार पंडित व त्यांच्या सहकार्यांनी जामीन घेण्याचा निर्णय घेतला. (वार्ताहर)