वादळी पावसाने मोखाड्यात वाताहत

By admin | Published: May 13, 2016 02:04 AM2016-05-13T02:04:27+5:302016-05-13T02:04:27+5:30

गेल्या एक दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असल्याने या तालुक्यात ठिक ठिकाणी मोठयÞा प्रमाणात नुकसान झाले आहे

Windy rain cavalchers | वादळी पावसाने मोखाड्यात वाताहत

वादळी पावसाने मोखाड्यात वाताहत

Next

मोखाडा : गेल्या एक दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असल्याने या तालुक्यात ठिक ठिकाणी मोठय प्रमाणात नुकसान झाले आहे
अनेक गाव-पाड्यांंमध्ये पावसाच्या सरी बरसू लागल्याने शेतीच्या कामात मग्न असलेल्या व मोखाडा बाजारपेठेमध्ये खरेदी साठी आलेल्या ग्राहक व प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
दोन दिवस अवेळी आलेल्या वादळी वारा व जोरदार गारपीटीने मोखाडा शहर, घोसाळी, गभालपाडा, राजीवनगर कोल्हद्याचापाडा धामणशेत तोरणशेत उधळे अशा अनेक गाव-पाड्यांतील घराचे मोठे नुकसान झाले असून काही घरांच्या भींतीची देखील पडझड झाली आहे. तर मोखाडा शहरातील पोलिस निरीक्षकांच्या शासकीय निवास्थानाचे छप्पर देखील उडवले
तोरणशेत येथील गोपाळ धोडी याचे घर जमीनदोस्त झाले आहे व घरातील माणसांनाही दुखापत झाली असून पुलाचीवाडी येथील देवराम साळवे याच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे कौलारु घरावरील अनेक कौले व पत्रे गायब झाले आहेत
एकीकडे स्थानिकस्तरावर रोजगार मिळत नसल्यांने अनेक गाव-पाडे ओस पडले असून पोटांची खळगी भरण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला भटकंती करावी लागत आहे तर दुसरी कडे अवकाळीने मोठे नुकसान केल्याने या घरांच्या दुरुस्तीसाठी पैसे आणायचे कुठून हा विचार नुकसानग्रस्तांना पडला आहे. कारण शासना कडुन मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम ही तोकडी असून ती देखील वेळेवर मिळत नाही यामुळे वरु ण राजांने तरी आमच्या वर कृपादृष्टी ठेवावी अशी प्रार्थना सर्व सामान्याकडून केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Windy rain cavalchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.