वसई- विरार शहरात "वाईन शॉप्स" न उघडल्याने मद्यप्रेमींची मात्र घोर निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:13 PM2020-05-04T21:13:43+5:302020-05-04T21:13:53+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे कुठलेही आदेश नसल्याने वाईन शॉप्स बंदच !

wine shops not opened in Vasai-Virar city DM not given permission | वसई- विरार शहरात "वाईन शॉप्स" न उघडल्याने मद्यप्रेमींची मात्र घोर निराशा

वसई- विरार शहरात "वाईन शॉप्स" न उघडल्याने मद्यप्रेमींची मात्र घोर निराशा

Next

वसई : वाईन शॉप्स आज उघडणार,संध्याकाळी उघडणार तसे सरकारचे आदेश आल्याच्या बातम्यांचा आधार घेत राज्यातील दारूची दुकाने उघडणार या बातम्यानंतर  वसई विरार शहराच्या विविध भागात असलेल्या वाईन शॉप बाहेर उत्साही मद्यप्रेमींची मात्र सोमवारी सकाळपासून मोठी गर्दी जमू लागल्याचे चित्र काही वेळ पाहायला मिळाले.

अक्षरश वसई विरार शहरातल्या काही ठिकाणी तर दीड ते दोन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.परंतु सोमवार दुपार पर्यंत एकही दुकान न उघडल्याने मात्र सकाळपासूनच रांगेत उभे असणाऱ्यांची घोर निराशा झाली.

दरम्यान, मद्यविक्रीची दुकाने उघडण्याचे कुठलेही आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नसल्याने दुकाने (वाईन शॉप) उघडण्यास परवानगी मिळणार नसल्याचे देखील तरी उशिरा राज्य उत्पादक शुल्क विभागाने स्पष्ट केले होते .

 

एकूणच सर्वत्र लॉकडाऊनमुळे मागील चाळीस दिवसापासून शहरात मद्य विक्रीची दुकाने (वाईन शॉप) आणि बिय़र शॉपी ,हॉटेल्स, रेस्टारंट आणि बार देखील संपूर्ण बंद आहेत. त्यामुळे असंख्य मद्यप्रेमींची चांगलीच पंचाईत झाली होती. परंतु सोमवार नंतर मद्यविक्रीची दुकाने त्या त्या झोन मध्ये उघडली जाणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

कुणी म्हणते संध्याकाळी तर कुणी म्हणते सकाळी अगदी सोमवार  पासून च वसई विरार शहरातील विविध मद्य विक्रीच्या दुकानाबाहेर मद्य खरेदीसाठी चाहत्यां नागरिकांच्या मोठ्याला रांगा लागल्या होत्या.

मग यामध्ये विरार मधील राज वाईन शॉप,वसई रॊड स्टेशन मधील मे. कामत वाईन शॉप, आर जे वाईन, सोपारा येथील लक्ष्मी वाईन शॉप, आदी अशा अनेक ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात दारूसाठी गर्दी केली होती.

 

मद्य खरेदीच्या आनांदात सोशल डिस्टंसिंग चा फज्जा !

धोकादायक म्हणजे महिना सव्वा महिन्यानंतर आपल्याला दारू मिळणार या आनंदात खरेदीसाठी आलेल्या मद्यप्रेमींनी त्या त्या दुकानाबाहेर व रस्त्यावर मोठी गर्दी केल्याने सर्वच ठिकाणी मास्क बरोबर सोशल डिस्टंसिंगचे हे पालन केलेले दिसून आले नाही.

अनेक ठिकाणी गर्दी आणि जमाव तयार झाल्याने अखेर त्या त्या भागातील पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थोड्या फार प्रमाणात आपल्या बळाचा वापर करीत सर्वांना पळवून लावले..  

 

अखेर वाईन शॉप मालकांनी लावले "नो ड्रिंक" चे फलक !

सर्व फज्जा उडाल्यावर बऱ्याच वेळांनी वाईन शॉप चालक-मालकांनी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत असे नो ड्रिंक चे फलक लावले. त्यामुळे गगनात मावेनासा आनंद घेत उभ्या राहिलेल्या मद्यपी तळीरामांची घोर व अक्षरशः निराशा झाली.

आज वसई विरार मध्ये बहुतेक वाईन शॉप च्या बाहेर वसई- विरार मधील आज दारूची दुकाने सुरु झाली नाहीत.तर पुढील आदेश मिळेपर्यंत वाईन शॉप सुरु हि केली जाणार नाहीत, असे हि फलक लावले होते.

Web Title: wine shops not opened in Vasai-Virar city DM not given permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.