कौटुंबिक वादातून जावेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा; विरार येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 02:10 PM2023-08-16T14:10:55+5:302023-08-16T14:12:22+5:30

याप्रकरणी आरोपी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पत्नी व भगत विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Witchcraft to induce abortion through family disputes; Shocking incident at Virar | कौटुंबिक वादातून जावेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा; विरार येथील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

मंगेश कराळे -

नालासोपारा - कौटुंबिक वादातून जावेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याचा अघोरी आणि धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. याप्रकरणी आरोपी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पत्नी व भगत विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विरार येथील गावात राहणाऱ्या सदर आरोपी महिलेचे घरात जाऊसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. आरोपी महिलेच्या जाऊला दिवस गेल्याचे लक्षात येताच वैयक्तिक आकसापोटी महिलेने १२ ऑगस्टला संध्याकाळी पाचच्या सुमारास परिसरातील अघोरी विद्या व जादूटोणा करणाऱ्या भगताला फोनवरून जाऊचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा करण्यास सांगत मोबाईल वरून भक्ताच्या बँक खात्यात चार हजार रुपये ऑनलाईनने पाठवले होते. आरोपी महिलेच्या पतीच्या हि बाब लक्षात येताच पत्नीने वैयक्तिक वादात अघोरी व अनिष्ठ प्रथेचा वापर केल्याप्रकरणी मंगळवारी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कलमाखाली दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मांडवी पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
 

Web Title: Witchcraft to induce abortion through family disputes; Shocking incident at Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.