महापालिका आयुक्तांविना, अतिरिक्त पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:37 AM2020-01-05T01:37:32+5:302020-01-05T01:37:35+5:30

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांनी दि. ३१ डिसेंबरला ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतल्याने येथील आयुक्तपद रिक्त झाले आहे.

Without the Municipal Commissioner, the additional charge is to the Collector | महापालिका आयुक्तांविना, अतिरिक्त पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे

महापालिका आयुक्तांविना, अतिरिक्त पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे

Next

वसई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेल्या बहुजन विकास आघाडी प्रणित आ. हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता असलेल्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांनी दि. ३१ डिसेंबरला ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतल्याने येथील आयुक्तपद रिक्त झाले आहे. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार आयुक्तांविनाच सुरू आहे. दरम्यान, आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका आयुक्तपद मागील चार दिवसांपासून रिक्त असून शासनाने पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपवला आहे. दरम्यान, सरकारचे खातेवाटप व्हायचे आहे तसेच पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे वसई-विरार पालिकेच्या आयुक्तपदाची धुरा कुणाकडे जाईल, याबाबत केवळ वाट पाहावी लागणार आहे. त्यातच जिल्हाधिकारी याबाबत वसई-विरार मनपाला कसा व कधी वेळ देतील, ही बाब विचार करण्याजोगी आहे. त्याचा विपरित परिणाम येथील महत्त्वाचे निर्णय, सभा, महासभा आणि नगररचना विभाग आदींवर होणार आहे.
>जिल्हाधिकारी
डॉ. कैलास शिंदेंची दुहेरी भूमिका
वसई-विरार महापालिका आयुक्त बी. जी. पवार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा पदभार आता पालघर जिल्हाधिकाºयांकडे गेला असून जिल्हाधिकारी पदासह त्यांना पालिका आयुक्तपदही सांभाळण्याची दुहेरी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कधी जिल्हाधिकारी पालघर कार्यालय तर कधी विरार महापालिका, अशा दररोज त्यांना व पालिकेतील अधिकारी वर्गाला फेºया माराव्या लागणार आहेत.

Web Title: Without the Municipal Commissioner, the additional charge is to the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.