व्याजाचे पैसे देऊनही महिलेला शिवीगाळ करत केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:58 AM2019-09-20T00:58:35+5:302019-09-20T00:58:38+5:30
पालघर येथील लेखा विभागात लेखा परीक्षक म्हणून काम करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेने २ लाख कर्ज घेतले होते.
नालासोपारा : पालघर येथील लेखा विभागात लेखा परीक्षक म्हणून काम करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेने २ लाख कर्ज घेतले होते. पण त्याबदल्यात तब्बल ३० लाख रूपये व्याज देऊनही मुद्दल दिली नाही म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाºया सावकारी आरोपी महिलेविरोधात माणिकपूर पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय असून कोणी अजून पीडित असतील तर त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वसई पश्चिमेकडील स्टेला या परिसरातील कर्मा अपार्टमेंटच्या सदनिका नंबर सी/४०४ मध्ये राहणाºया आणि पालघर येथील लेखा विभागात लेखा परीक्षक म्हणून नोकरी करणाºया सीता पंकजाक्षण (५९) यांचा मुलगा प्रफुल्ल याचा फेब्रुवारी २०१६ रोजी साखरपुडा ठरल्याने दोन लाखांची गरज होती. त्यावेळी सोसायटीमधील लोकांकडून कळले की, आपल्याच सोसायटीमधील हेमलता सैनी या व्याजाने पैसे देते. त्यामुळे तिला जाऊन भेटल्यावर तुम्ही व्याजाने पैसे देता का ? तुमच्याकडे सावकारी अधिनियमनव्ये व्याजाने पैसे देण्याचा कोणता परवाना आहे का ? त्यावर हेमलता यांनी सीता यांना असा कोणताही परवाना नसून आजपर्यंत अनेकांना व्याजाने पैसे दिल्याचे सांगितले.
तुम्हाला हवे आहे का ? असे विचारल्यावर मला पैशाची गरज असून तिच्याकडून सीता यांनी १५ टक्के व्याजाने दोन लाख रु पये घेतले. व्याज म्हणून दर महिन्याला ३० हजार रु पये देण्याचे ठरले होते. आजपर्यंत सीता यांनी हेमलता यांच्या खात्यावर आॅनलाईन कॅनरा बँक, जनसेवा बँक यामध्ये १६ लाख ७६ हजार ५० रु पये आणि रोखीने १३ लाख २३ हजार ९५० रु पये असे एकूण ३० लाख रूपयांचे व्याज दिले आहे. तरीसुद्धा पैसे बाकी असल्याचे सांगण्यात आले व १६ तारखेला रात्री १० वाजण्याच्या सुमारास हेमलता घरी येऊन व्याजाचे पैसे मागू लागली व तिच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने खेचून घेत पैसे दिल्यावर मोबाइल परत देईन असे सांगून निघून गेली.
दुसºया दिवशी म्हणजेच १७ तारखेला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास सीता यांच्या घरी परत येऊन सीता यांच्या पतीला सांगितले की, तुमच्या पत्नीने व्याजाने पैसे घेतले असून मला लवकरात लवकर पैसे पाहिजे असे सांगत शिवीगाळ करून दमदाटी करत धक्काबुक्की केली.
>पोलीसही आश्चर्यचकित
शेवटी कंटाळून पुराव्यासह माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन सीता यांनी पोलिसांना
२ लाखांसाठी ३० लाख रूपये व्याज दिल्याचे सांगितल्यावर आश्चर्यचकित झाले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.