स्वच्छतेच्या प्रश्नावर महिला आक्रमक

By admin | Published: August 1, 2015 11:26 PM2015-08-01T23:26:48+5:302015-08-01T23:26:48+5:30

शहरातील अस्वच्छततेमुळे सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून वारंवार नगरपरिषदेकडे या अस्वच्छतेबाबत तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील

Woman aggressor on cleanliness question | स्वच्छतेच्या प्रश्नावर महिला आक्रमक

स्वच्छतेच्या प्रश्नावर महिला आक्रमक

Next

महाड : शहरातील अस्वच्छततेमुळे सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून वारंवार नगरपरिषदेकडे या अस्वच्छतेबाबत तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील महिलांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आज केली.
शहरातील मुख्य नाले, गटारे यांची योग्य प्रकारे सफाई न केल्याने शहरातील अनेक भागात दुर्गंधी पसरून वेगवेगळ्या साथींनी असंख्य रुग्ण त्रस्त आहेत. याबाबत महाड नगरपरिषदेकडे केलेल्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व महिलांनी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना याबाबत निवेदन दिले.
याबाबत न. प. मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी सातपुते यांनी या महिलांना दिले. या वेळी दीपाली दाते, पिंपुटकर, देशमुख आदी महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: Woman aggressor on cleanliness question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.