रेल्वे ट्रॅकमधून पाण्यात पडून एक महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:45 PM2019-08-01T23:45:48+5:302019-08-01T23:46:02+5:30
या गावातील विद्यार्थी, महिला, कामगार यांना सफाळे किंवा वैतरणा स्थानक गाठण्यासाठी वैतरणा पुलावरील रेल्वे ट्रॅकच्यामध्ये पश्चिम
पालघर : वैतरणा खाडी पुलावरील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला लावण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्याच्या गॅपमधून (फटीमधून) खाली पाण्यात पडून वाढीव येथील बेबीबाई रमेश भोईर या ६० वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप वाढीव ग्रामस्थांनी केला आहे.
या गावातील विद्यार्थी, महिला, कामगार यांना सफाळे किंवा वैतरणा स्थानक गाठण्यासाठी वैतरणा पुलावरील रेल्वे ट्रॅकच्यामध्ये पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोखंडी प्लेट्स टाकून बनविलेल्या रस्त्यावरून जाण्याशिवाय अन्य मार्गच उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. याचाच फटका बेबीबाई भोईर यांना बसला. खाजगी रु ग्णालयात दाखल आपल्या मुलीसाठी डबा घेऊन वैतरणा पुलावरून वैतरणा स्थानक गाठण्यासाठी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान जात होत्या. यावेळी अचानक आलेला पाऊस आणि वारा यामुळे लवकर स्थानक गाठण्याच्या दृष्टीने त्या पटापट चालू लागल्या. या गडबडीत रेल्वे ट्रॅक आणि लोखंडी पट्ट्यांनी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या फटीमधून त्या पुलाखालून वाहणाऱ्या वैतरणा खाडीत पडल्या.