‘मागासलेपणाचा ठपका महिलांनीच पुसून काढावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:57 AM2018-10-04T04:57:11+5:302018-10-04T04:57:27+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : शेतकरी मेळाव्यात हजारोे शेतकरी

'Women should get rid of backwardness of backwardness' | ‘मागासलेपणाचा ठपका महिलांनीच पुसून काढावा’

‘मागासलेपणाचा ठपका महिलांनीच पुसून काढावा’

Next

पालघर : मुलीच्या जन्माने आमच्या घरात दु:खाचे वातावरण निर्माण होत नाही, त्यावरुन आम्ही घरातील महिलांना त्रास देत नाही हे आमचे मानिसक पुढारलेपण असून जिल्ह्यावर लावण्यात येत असलेल्या मागासलेपणाच्या ठपक्याला त्यामुळे काही अर्थ उरत नाही. हा जिल्ह्याला लागलेला ठपका सर्व महिलांनी एकत्र आल्यास तात्काळ पुसून काढू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी झडपोली येथे शेतकरी मेळाव्यात काढले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाडा आणि गोवर्धन इको व्हिलेज गालतरे यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या मेळाव्यात हजारो शेतकरी कुटुंबीयांसह उपस्थित होते. यात मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा कृषी अधीक्षक तरकसे, पशुधन अधिकारी अजित हिरवे, उपयुक्त कांबळी, डॉ.हेमंत सवरा, ब्राह्मकुमार राजुभाई, मनमोहन दास, सभापती खुताडे, आयोजक भगवान सांबरे उपस्थित होते.
आपण कितीही चांगले उत्पादन घेतले, पावसाने कितीही चांगली साथ दिली तरी शेतकºयांच्या उत्पादनाचा भाव आपल्या हातात नसल्याने शेती परवडत नसल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्ह्यातील शेतकºयांना एकत्र आणण्याचे मोठे काम निलेश सांबरे यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले आहे. या कार्यात शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिला.
शेतकºयांच्या सुशिक्षित मुलांनी आपल्या शिक्षणाचा खºया अर्थाने उपयोग करण्यासाठी आपल्या शेतातील उत्पादनाचे ब्रँडिंग, प्रोसेसिंग, पॅकेजिंग स्वत: करण्यासाठी पुढे यावे, त्यासाठी सुरु वातीपासून ते शेवटपर्यंत शासन आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला. जिल्ह्यात साडेचार हजार शेतकºयांनाचे गट तयार करण्यात आले असून ५८ खाजगी कंपन्या तयार करण्यात आल्या आहेत. मोखाडा, माकूणसार येथून कामाला सुरु वात करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोरीकर यांनी सांबरे यांनी उभ्या केलेल्या शेती चळवळीचे कौतुक करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीतून चांगले पैसे हातात पडू लागल्यास शेती पासून दूर चाललेला तरु ण पुन्हा वळू शकतो. हा त्यांना मिळालेला विश्वास म्हणजेच या कार्यक्र माचे फलित ठरणार आहे असे डॉ. सवरा यांनी सांगितले. कार्यक्र माचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर,निलेश सांबरे, राजुभाई, दास आदी मान्यवर.
 

Web Title: 'Women should get rid of backwardness of backwardness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.