विक्रमगडमधील २० ग्रा.पं.त महिला सरपंच
By admin | Published: June 5, 2016 02:49 AM2016-06-05T02:49:42+5:302016-06-05T02:49:42+5:30
तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकापैकी २० ग्रामपंचायतीत ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाड्यातील अनुसुचित जमातीच्या महिला सरपंचपदी विराजमान
विक्रमगड : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकापैकी २० ग्रामपंचायतीत ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाड्यातील अनुसुचित जमातीच्या महिला सरपंचपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे या ग्रापंमध्ये महिला राज असणार आहे.
तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या १४२ प्राभागातील ३१२ जागांसाठींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्या प्रमाणे ६३ उमेदवार बिनविरोध झाले विक्रमगड ग्रामपंचायतीमधून कुणाही उमेदवारांनी अर्ज दाखल केले नव्हता.त्यानुसार १७ एप्रिल रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यांत आल्या होत्या.व तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ७५.९ टक्के मतदान झाले.आणि १८ एप्रिल रोजी संपूर्ण ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर करण्यांत आला.
दरम्यानच्या काळात या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या मुदतीच्या दोन महिने अगोदरच झाल्या असल्याने निकाल लागूनही विजयी उमेदवारांना सरपंचाच्या खुर्चीची प्रतिक्षा करावी लागली आहे. मात्र आता तो काळ जवळ आलेला आहे.
(वार्ताहर)
आतापासूनच यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या असून सरपंच व उपसरपंच यादीमध्ये असलेल्या उमेदवारांची निवडून आलेल्या सदस्यांना आपल्याकडे खेचण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याची मनधरणी करण्याचे सुरु झाले आहे व त्याप्रमाणे सरपंचपदासाठी तयारी सुरु झाली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी परंपरागत राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.