महिला तलाठीची वाळू माफियावर धाडसी कारवाई; महिला कोतवालला धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:30 PM2023-11-30T23:30:51+5:302023-11-30T23:31:03+5:30

भाईंदरच्या तलाठी अनिता पाडवी ह्या गुरुवारी बेकायदा गौण खनिज वाहतूक तपासणी व कारवाईसाठी भाईंदर पश्चिम , मॅक्सस मॉल समोर कर्तव्यावर होत्या .

Women's Talathi's bold action against sand mafia; Three arrested for assaulting female Kotwal | महिला तलाठीची वाळू माफियावर धाडसी कारवाई; महिला कोतवालला धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना पकडले 

महिला तलाठीची वाळू माफियावर धाडसी कारवाई; महिला कोतवालला धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना पकडले 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला रिक्षातून पाठलाग करून महिला तलाठी यांनी पकडून अपर तहसीलदार कार्यालया कडे नेत असताना चालक पळून गेला. तर ट्रक पकडला म्हणून मालक व कुटुंबाने येऊन महिला कोतवालला धक्काबुक्की, अरेरावी केल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

भाईंदरच्या तलाठी अनिता पाडवी ह्या गुरुवारी बेकायदा गौण खनिज वाहतूक तपासणी व कारवाईसाठी भाईंदर पश्चिम , मॅक्सस मॉल समोर कर्तव्यावर होत्या . रेतीने भरलेला एक ट्रक पकडल्यानंतर कोतवाल सविता जाधव व त्यांचा खाजगी चालक हे पकडलेला ट्रक घेऊन अपर तहसील कार्यालयात गेले . त्या दरम्यान वाळूने भरलेला एक ट्रक पाहून पाडवी यांनी चालकास थांबवण्यात सांगितले असता तो पळून जाऊ लागला. पाडवी यांनी रिक्षातून पाठलाग करत तो ट्रक सुभाषचंद्र बोस मैदान जवळ अडवला. ट्रक सह चालकास अपर तहसील कार्यालय येथे घेऊन जात असताना मॅक्सस मॉल लगतच्या रस्त्यावर चालकाने ट्रक थांबवला व तो पाडवी यांच्याशी हुज्जत घालून ट्रक सोडून पळून गेला.

पाडवी यांनी जाधव यांना बोलावून घेतले व त्या स्वतः मदतीसाठी भाईंदर पोलीस ठाण्यात गेल्या.  ट्रकच्या ठिकाणी रुक्मिणी बालाजी फड (४५) , बालाजी रामराव फड (५९) व दत्ता बालाजी फड (३०) सर्व राहणार जाधव चाळ, जनता नगर डोंगरी, काशीमीरा हे तिघे आले व जाधव यांना धक्काबुक्की, दमदाटी करू लागले. जाधव यांनी पाडवी यांना कॉल लावला असता त्यांनी त्यांच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला.  दरम्यान त्यांच्या एका साथीदाराने तो रेतीचा ट्रक पळवून नेला.

 पाडवी ह्या भाईंदर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले असता पोलिसांची गाडी पाहून ते तिघे रिक्षातून बसून पळून जाऊ लागले. पाडवी व भाईंदर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून गोल्डन नेस्ट येथे तिघांना पकडले. पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले व पाडवी यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.  तर ट्रक ताब्यात घेतला आहे. 

 

Web Title: Women's Talathi's bold action against sand mafia; Three arrested for assaulting female Kotwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.