कुंभीपाड्यातील आदिवासींना तीन वर्षांनी रोहयोचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:08 AM2018-02-23T02:08:08+5:302018-02-23T02:08:12+5:30
मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम या तत्वावर आधारलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा शासकीय
मोखाडा : मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम या तत्वावर आधारलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा शासकीय पातळीवर कितीही गवगवा केला जात असला तरी स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे रोहयोची योजना पूर्णत: बासनात गुंडाळल्याचा प्रत्यय आदिवासींना येत असल्याचे चित्र कायम असतांना मात्र ^^‘कुंभीपाडा येथे गेल्या तीन वर्षात रोहयोचे कामच नाही’ या मथळ्याखाली लोकमतच्या २० फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रसिध्द करताच त्याची मोखाडा प्रभारी तहसिलदार पी. जी. कोरडे यांनी गंभीरतेने दखल घेऊन २३ तारखेपासून येथे त्वरीत काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे लवकरच कुंभीपाडा वासीयांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने येथील आदिवासींंनी समाधान व्यक्त करून लोकमतचे आभार मानले आहेत.