पतंगशहा रुग्णालयात कामगारांचे आंदोलन; पगारवाढ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:25 PM2020-02-01T23:25:04+5:302020-02-01T23:25:21+5:30
भविष्य निर्वाह भत्ता
जव्हार : जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून पगार नाही व त्यांना भविष्य निर्वाह निधी, भत्ता आणि पगारवाढ व्हावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने रुग्णालयासमोर शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात शिपाई १, कक्षसेवक १, अपघात विभाग सेवक २, बाह्यरुग्ण सेवक १, शस्त्रक्रियागृह परिचर १, रक्तपेढी परिचारक १, सफाईगार ४ असे वेगवेगळ्या पदांवर १४ ते १५ वर्षांपासून रोजंदारीवर कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. ही कंत्राटी (स्वच्छता सेवा) सफाईगार व शिपाईगार या पदांवर पालघर जिल्हा चिकित्सक यांच्यानुसार ही कंत्राटी सफाईगार मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था बोईसर यांना भरती केली आहे. हे सफाईगार अनेक वर्षांपासून रुग्णालय कामे करीत आहेत.
मात्र त्या सफाईगार रोजंदारी कर्मचाऱ्यांना ५ ते ६ महिन्यापासून पगार नाही. तसेच पगारवाढ व्हावी आणि भविष्य निर्वाह निधी मिळत नसल्याने श्रमजीवी घटनेचा आधार घेत बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. मात्र मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था बोईसर यांच्याकडे या सफाई रोजंदारी कर्मचाºयांनी पगारवाढ आणि भविष्य निर्वाह भत्ता ही मागणी केली असता या कर्मचाºयांना मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी यांनी या रोजंदारी कर्मचाºयांना तत्काळ कमी केल्याने हे कंत्राटी कर्मचारी वैतागले असून पगारवाढ आणि भविष्य निर्वाह निधीसाठी रु ग्णालयासमोर शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.
जव्हारचे पतंगशहा रु ग्णालय हे उपजिल्हा रु ग्णालय असल्याने येथे रोजच मोठी गर्दी असते. मात्र रोजंदारीवर काम करणाºया कामगारांना मे. राजश्री शाहू महाराज संस्थेकडून १६६ रुपये दिवस मजुरी मिळत आहे. मात्र त्याही मजुरीचा पगार महिन्याला वेळेत मिळत नाही.
कुटीर रु ग्णलयात एकूण १२ कर्मचारी सफाईगार म्हणून सध्या काम करीत आहेत. भविष्य निर्वाह निधी मिळावा आणि पगारवाढीसाठी ते बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. रुग्णालय रोजंदारी कर्मचारी व श्रमजीवी संघटना तालुकाध्यक्ष कमलाकर धूम, सचिव संतोष धिंडा, पं.स.सदस्य अजित गायकवाड, शहराध्यक्ष जमशेद शेख, अन्य मजूर कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत.