मोलमजुरी करणारे हात मदतीसाठी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:56 PM2019-08-26T23:56:37+5:302019-08-26T23:56:43+5:30
अन्नधान्यासह पैशांची मदत : विक्र मगडच्या गावागावांतून पूरग्रस्तांना मदत
राहूल वाडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक सामाजिक संस्था, धार्मिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. असे असताना तालुक्यातील माण गावातील वीट-भट्टीवर मोल-मजुरी करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबे सामाजिक जाणिवेतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहेत.
माण गावातील बहुतेक कुटुंबे वीट भट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मात्र कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांची घरे मातीमोल झाली, हे कळल्यावर या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ते एकवटले. वीट भट्टीवर मोलमजुरी करून मिळालेल्या मजुरीतून अन्नधान्य विकत आणून आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करणाऱ्यांनी या पूरग्रस्तांना धान्य, पैसे, कपड्यांची मदत केली आहे. धान्य, तांदूळ- १८५ किलो, मीठ- ५० किलो, गहू आटा- २३२ किलो आणि निधी स्वरूपात मदत केली. कष्टकरी, कामगार अशी वस्ती असलेल्या भागातील रहिवाशांच्या मदतीमुळे कौतुक होत आहे.
पुरामधे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. माणुसकीच्या नात्याने या पूरग्रस्तासांठी आम्ही गावातून स्वेच्छेने आमच्या परीने धान्य, कपडे, पैसे मदत स्वरूपात गोळा केली आहेत. गावातील सर्व महिलांनी यासाठी पुढाकार घेतला.
- मीना सुकºया दळवी,
मोल-मजुरी करणारी महिला, माण
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आमच्या गावातील वीट भट्टीवर मोल-मजुरी करणाºया व अन्न-धान्य विकत आणणाºया अनेक कुटुंबानी पैसे, धान्य, कपडे, मीठ स्वरूपात पूरग्रस्तासांठी माणुसकीच्या नात्याने मदत केली आहे. यासाठी महिला, तरुणाचा सहभाग
महत्त्वाचा होता.
-विलास पाडवी, तरु ण, माण
मोल-मजुरी करून उदरिनर्वाह करणाºया या कुटुंबांनी तांदूळ, गहू, कपडे, मीठ स्वरूपात कोल्हापूर, सांगली पूरग्रस्ताना मदत केली आहे. ही मदत आमच्यासाठी अनमोल असून आम्ही ती गरजूपर्यंत नक्की पोहोचवू. - प्रतीक धनराज पाटील, पुरग्रस्ताना मदत घेऊन जाणाºया टीममधील सदस्य