कामगारांचे कौशल्य टीमाने विकसित केले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 11:54 PM2017-10-01T23:54:48+5:302017-10-01T23:54:58+5:30
या तालुक्यातील आच्छाड येथील टीमा कंपनीने आदिवासी कामगारांमधील कौशल्य विकसित केल्याने आज ते चांगला रोजगार मिळावीत आहेत.
तलासरी : या तालुक्यातील आच्छाड येथील टीमा कंपनीने आदिवासी कामगारांमधील कौशल्य विकसित केल्याने आज ते चांगला रोजगार मिळावीत आहेत. असे गौरवोद्गार खासदार चिंतामण वनगा यांनी दसºयाला कंपनीत आयोजिलेल्या कार्यक्रमात काढले. या वेळी आमदार पास्कल धनारे, उद्योजक अजित नार्वेकर, पंचायत समिती सदस्य सुनील निकुंभ, प्रकाश सांबर, कंपनीचे संचालक हरीश सिप्पी इत्यांदिसह कामगार, व अधिकारी उपस्थित होते
ही कंपनी आदिवासी भागातील सर्वात जुनी असून तिचे व्यवस्थापकीय संचालक हरीश सिप्पी यांनी येथे कंपनी सुरू करून येथील आदिवासी बांधवाला रोजगार उपलब्ध करून दिला.
येथील आदिवासी समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती व जंगलातील वनौपज संपत्ती गोळा करून त्याची विक्र ी होता, परंतु यांना या व्यतिरिक्त उत्पन्न रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस मनाशी बाळगून आदिवासी भागात कारखाना निर्माण केला याचे अनुकरण करून इतर कारखानदारांनीही या भागात आपले कारखाने उभे केले त्यामुळे औदयोगिकरन वाढून येथील लोकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला संचालक हरीश सिप्पी यांनी येथील गवत कापणाºया मजुरांना कंपनीत कामाला लावून त्यांना वेल्डिंग, फिटरचे तसेच मशीन चालविण्याचे प्रशिक्षण दिले. त्याच्यातील कौशल्य विकिसत केले. तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना चांगला रोजगार उपलब्ध करून दिला असून कामगारांना अनेक सोयी सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. असे कंपनीचे एम डी हरीष सिप्पी यांनी सांगितले.