धोंडमाऱ्याच्या शाळेला श्रमजीवीने ठोकले टाळे
By admin | Published: January 25, 2017 03:41 AM2017-01-25T03:41:20+5:302017-01-25T03:41:20+5:30
तालुक्यातील खोच केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धोंडमाऱ्याची मेट जिल्हा परिषद शाळेला श्रमजिवीने टाळे ठोकले आहे. मोखाड्यातील
Next
मोखाडा : तालुक्यातील खोच केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धोंडमाऱ्याची मेट जिल्हा परिषद शाळेला श्रमजिवीने टाळे ठोकले आहे. मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, अशा धोकादायक इमारतीत आदिवासी मुले जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १५८ शाळा असून, ४० इमारती धोकादायक असून, याबाबतचे वृतही ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. (प्रतिनिधी)