‘हंगर’ लघुपटाचा जागतिक सन्मान; पालघर जिल्ह्यातील कुपोषणाला फोडली वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:03 AM2017-12-03T02:03:33+5:302017-12-03T02:04:01+5:30
पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य आणि भुकेचे वास्तव जगासमोर मांडणाºया योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा इंटरनॅशनलचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य आणि भुकेचे वास्तव जगासमोर मांडणाºया योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा इंटरनॅशनलचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ जानेवारीला अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे होणाºया सोहळ््यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भारतात दर अर्ध्या तासाला एक मूल भुकेमुळे दगावते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात भुकेने मृत्युमुखी पडत असलेल्या बालकांचे प्रमाण भयावह आहे. देशात कुपोषणाने होणाºया बालमृत्युंमध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे. येथील बालमृृ्त्युंवर प्रकाशझोत टाकणाºया ‘हंगर’ या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन योगिनी सुर्वे यांनी केले आहे. विशाल वासू लघुपटाचे निर्माते असून, कौशल गोस्वामी यांनी लघुपटाचे चित्रीकरण केले आहे.
उमेश ढोबळे यांनी लघुपटाचे एडिटिंग केले आहे. जिल्ह्यातील एका संवेदनशील विषयाला वाचा फोडणाºया ‘हंगर’ लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार मिळाला आहे.
या लघुपटाला आजवर सहा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाले आहेत, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव न्यूयॉर्क आणि हॉलीवूड इंटरनॅशनल मूव्हीज फिल्म फेस्टिव्हल या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया महोत्सवातही या लघुपटाला पुरस्कार मिळाले आहेत.
समस्येचे उच्चाटन व्हावे
लघुपटाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्तांचे चित्र जगासमोर मांडता आले. मिळालेल्या पुरस्काराचा आनंद असला, तरी समस्येचे समूळ उच्चाटन झाल्यास अधिक आनंद होईल.
- योगिनी सुर्वे, दिग्दर्शिका