पेसा योजनेंतर्गत गावांना निधी देताना चुकीचे निकष
By admin | Published: October 4, 2015 12:01 AM2015-10-04T00:01:43+5:302015-10-04T00:01:43+5:30
पालघर जिल्ह्यातील ९६६ गावांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच पेसा योजनेंतर्गत ३६ कोटी ९९ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. या निधीचे वाटप करताना चुकीचे
वसई : पालघर जिल्ह्यातील ९६६ गावांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच पेसा योजनेंतर्गत ३६ कोटी ९९ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. या निधीचे वाटप करताना चुकीचे निकष लावण्यात आल्याचे शासनाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.
एकूण ८ तालुक्यांपैकी ७ तालुके आदिवासी आहेत. या ७ तालुक्यांत वसई तालुका हा एकमेव तालुका बिगर आदिवासी आहे. या तालुक्यातील २७ गावांना १ कोटी २४ लाख ९७ हजार तर डहाणूसारख्या आदिवासीबहुल तालुक्यास १ कोटी २ लाख ९ हजार रुपये निधी मिळणार आहे. या तालुक्यात १७४ पेसा
गावे आहेत.
राज्यातील आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तालुक्यातील आदिवासी गावांची लोकसंख्या प्रमाण ठरवून या निधीचे वाटप करण्यात येते.
परंतु, वसई व डहाणू तालुक्यांमध्ये चुकीचा निकष लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. (प्रतिनिधी)
वसई तालुक्यात केवळ २७ गावे पेसा गावे असून त्यांना १ कोटी २४ लाख ९७ हजार तर डहाणूतील १७४ गावांना १ कोटी २ लाख ९ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. वसईत २७ गावांपैकी १५ गावे पूर्णत: आदिवासी आहेत, तर डहाणूची संख्या दुप्पट असताना आर्थिक निधी कमी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पालघर व वाडा तालुक्यांबाबतही चुकीचे निकष लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. आदिवासी गावांचा विकास व्हावा, याकरिता शासनाने एक्स्टेन्शन टू शेड्युल्ड एरिया या योजनेंतर्गत आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. वर्ष २०१४ या योजनेस मंजुरी देण्यात आली.