नाराज भाजपावाल्यांची युतीधर्माकडे पाठ; धनुष्यावर मत कसे देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:28 PM2019-03-28T23:28:09+5:302019-03-28T23:28:16+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, युतीसाठी पालघरमध्ये शिवसेनेच्या उमदवाराचे बटन दाबण्याची खंत वाट त असल्याची प्रतिक्र ीया गुरुवारी भाजपा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी डहाणू येथे व्यक्त केली.
डहाणू : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, युतीसाठी पालघरमध्ये शिवसेनेच्या उमदवाराचे बटन दाबण्याची खंत वाट त असल्याची प्रतिक्र ीया गुरुवारी भाजपा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी डहाणू येथे व्यक्त केली.
पालघरच्या जागेसाठी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत युतीच्या सभा, मेळाव्याला न जाण्याचा निर्णय डहाणू सरावली येथे भाजपाच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याने पालघरमध्ये शिवसेना आणि भाजपाामधले बंड समोर आले आहे. पालघर जिल्हयात भाजपाचा एक खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषदेचे २१ सदस्य पंचायत समिती, जिल्हारिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, अनेक ग्रामंचायती, ३ नगराध्यक्ष, नगरसेवक अशी प्रचंड ताकद आहे. त्यामुळे पालघरच्या जागेसाठी भाजपााच्या नेत्यांनी फेरविचार करावा असे म्हणत भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी डहाणू येथील बैठकीत आक्र मक बनले होते.
पालघरमध्ये भाजपाचाच उमेदवार निवडुन येऊ शकेल, असे वातावारण असून कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. पालघरची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजपामध्ये नाराजी पसरली आहे. त्याबद्दल डहाणू येथील सभेत जिल्हयातील पदाधिकारी कार्यकर्ते महीला पदाधिकारी यांनी तिखट शब्दात प्रतिक्र ीया व्यक्त केली. नगराध्यक्ष भरत राजपूत, आदिवासी आघाडी प्रमुख हरिश्चंद्र भोये, लुईस काकड, नंदकुमार पाटील, विना देशमुख महीला आघाडी प्रमुख, सरपंच सुरेश शिंदा, जगदिश राजपूत, विवेक कोर आदी यावेळी उपस्थित होते.
नगराध्यक्षही झाले व्यथित
पालघरची जागा शिवसेनेला दिली तर भाजपाची ताकद असताना कामासाठी भाजपााच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दारी उभे राहायचे का ? असा सवाल नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी उपस्थित केला.
पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाप्रमाणे कार्यकर्त्यांबरोबर आपणही राजीनामा देण्याची तयारी भरत राजपूत यांनी दर्शवली.