वाडा येथील डॉक्टरांच्या हलगर्जीने युवासेना पदाधिकाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:35 PM2018-09-03T23:35:37+5:302018-09-03T23:35:50+5:30

या शहरातील नामांकित भडांगे हॉस्पिटलच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे शहर युवा सेनेचे उप अधिकारी अजय रवींद्र ठाकरे यांचा मृत्यू झाला असून याबाबत त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टर प्रशांत भडांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

 Yagya Sena's death in Wada | वाडा येथील डॉक्टरांच्या हलगर्जीने युवासेना पदाधिकाऱ्याचा मृत्यू

वाडा येथील डॉक्टरांच्या हलगर्जीने युवासेना पदाधिकाऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

वाडा : या शहरातील नामांकित भडांगे हॉस्पिटलच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे शहर युवा सेनेचे उप अधिकारी अजय रवींद्र ठाकरे यांचा मृत्यू झाला असून याबाबत त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टर प्रशांत भडांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
अजय यास पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याने शुक्र वार दि.३१ आॅगस्ट रोजी भडांगे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. गेले तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते. नातेवाईकांनी डॉक्टरांकडे तब्येतीबाबत विचारणा केली असता त्याची तब्येत सुधारत असल्याचे सांगण्यात आले परंतु रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भडांगे हॉस्पिटल मधील कर्मचाºयांनी कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अजय यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच अजयचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारामुळे डॉ. भडांगे यांच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

अजय ठाकरे यांचा मृत्यू ही घटना संशय निर्माण करणारी असून त्याची सखोल चौकशी करून संबधीत डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.
- निलेश गंधे, उपाध्यक्ष,
पालघर जिल्हा परिषद

Web Title:  Yagya Sena's death in Wada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.