आधारअभावी वर्ष गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:04 AM2018-04-10T03:04:22+5:302018-04-10T03:04:22+5:30

शासनाच्यावतीने आधार कार्डचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी सक्तीचा करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे

Years of absence failed | आधारअभावी वर्ष गेले वाया

आधारअभावी वर्ष गेले वाया

Next

तलवाडा : शासनाच्यावतीने आधार कार्डचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी सक्तीचा करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे मात्र, त्याचा फटका विक्र मगड तालुक्यातील हातने या गावातील सूरज सुभाष कडु या विद्यार्थ्याला बसला असून सूरज कडूकडे आधारकार्ड नसल्याने २०१७-१८ चे शैक्षणिक वर्ष वाया गेले त्याने माहिती देताना सागितले.
दरम्यान या विद्यार्थ्याचे १२ वी नंतर देवळाली कॅँम्प भगूर ता. सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शताब्दी इंस्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी (पोलिटेक्निकल) या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, आधार कार्ड नसल्याने त्याची शिष्यवृत्ती जमा होऊ शकली नाही. त्यातच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कॉलेजची ४० हजार रु पये एवढी फी भरण्यास तो असमर्थ ठरला. त्यामुळे त्याचे २०१७-१८ चे पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले.
सूरज याने आधार कार्ड काढण्यासाठी आत्तापर्यंत दहा वेळा आॅनलाइन अ‍ॅप्लकेशन केले आहे. मात्र प्रत्येक वेळी ते अपात्र ठरविण्यात आले आहे. आधार कार्ड साठी त्यांनी मुंबईच्या कार्यालयापासून सर्वत्र धावाधाव केली आहे. येवढे प्रयत्न करुनही त्याला आतापर्यंत आधार कार्ड मिळालेले नाही. जर त्याला आधार कार्ड मिळाले नाही तर पुढील शैक्षणिक वर्ष ही वाया जाण्याची भीती त्याने वेक्त केली.
केंद्र सरकारने आधारकार्ड अनिवार्य केले असले तरी लालफितीमुळे या विद्यार्थ्याचे नुकसा झाले हेच खरे.
>बंगळुरूपासून मुंबईपर्यंत सर्व ठिकाणी खटपट
सूरज याने आधार कार्ड काढण्यासाठी आत्तापर्यंत दहा वेळा आॅनलाइन अ‍ॅप्लिकेशन केले आहे. मात्र प्रत्येक वेळी ते अपात्र ठरविण्यात आले. या बाबत त्याने आधारकार्डचे मुख्यकार्यालय बंगलोर येथे दुरध्वनी वरु ण संपर्क साधला असता मुंबई येथील कार्यलायात संपर्क सधानाचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्याने प्रत्यक्ष मुंबई येथे स्व:त जावून चौकशी केली असता आधारकार्ड पोस्टाद्वारे तुमचा घरी येईल असे सांगण्यात आले. चार महीने उलटुंन ही ते न आल्याने आधारकार्ड वीना पुढील शैक्षणिक वर्ष ही वाया जाईल अशी भीती सूरज कडू या विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे.
मी आत्तापर्यंत जवळपास दहा वेळा आधार कार्डासाठी आॅनलाइन अ‍ॅप्लकेशन केले आहे. मात्र, प्रत्तेक वेळी ते रिजेक्ट झाले आहे. याचा फटका माझ्या शैक्षणिक आलेखावर पडला असून त्यामुळे माझे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. जर आत्तासुद्धा माझे आधार कार्ड मिळाले नाही तर पुढील माझे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधार सक्ति ही विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे असे मला तरी अनुभवावरु न वाटते.
-सूरज कडु (पिडित विद्यार्थी)

Web Title: Years of absence failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.