वसईकरांवर यंदा पाणी कपातीचे विघ्न नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 11:39 PM2019-05-11T23:39:16+5:302019-05-11T23:39:36+5:30
यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.
नालासोपारा : यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. विशेषत: वसई-विरार शहर महानगरपालिकेतील वाढती लोकसंख्या पाहता यंदा वसई-विरारकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे वाटत होते. मात्र महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात वसई-विरारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याचे जाहीर केल्याने दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर झाल्याने हे शक्य झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
मे महिन्यात जिकडे तिकडे पाणीटंचाईचे सावट आहे. मात्र महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने या उन्हाळ्यात वसईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा ३ मधून १०० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन वसई-विरारकरांना मिळत आहे. सध्या धामणी धरणात २४ टक्के पाणीसाठा असून उसगाव धरणात २१.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर पेल्हार धरणात १९.४९ टक्के पाणीसाठा आहे. वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाºÞया धरणात मुबलक साठा असल्याने पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरारमधील पाणीकपात तूर्त टळली असली तरी दुष्काळ परिस्थितीत कोठे कोठे पाणी मुरते यावर सर्वेक्षण करून पालिकेने त्यादृष्टीने ठोस प्रयत्न राबवायला सुरूवात केली आहे. प्रामुख्याने पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. काही ठिकाणी पाणी चोरी होत आहे. या सर्वांवर चाप लावण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पाणीचोरीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. सध्या पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांवर त्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महापालिकेने पावसाळ्याआधी करण्यात येणाºया कामांचादेखील आढावा घेतला असून सर्वेक्षणानुसार जुने पंप बदलणे, त्यांची दुरुस्ती करणे, पावसाळ्याआधी यंत्रणा तपासणे ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत.
मुख्यत: पावसाळ्यात झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. मासवण आणि धुकटन येथे पाणी खेचण्यासाठी वीज पुरवठ्याची यंत्रणा आहे. मनोर आणि पालघर फिडर हे जंगलातून जात असल्याने त्यावरील फांद्या काप ल्या आहेत.