योगा कराल, तर १०० वर्षे जगाल!

By admin | Published: January 11, 2017 05:50 AM2017-01-11T05:50:17+5:302017-01-11T05:50:17+5:30

आनंददायी आयुष्यासाठी योग फलदायी असून नित्यनियमाने योग करणारी व्यक्ती शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगू शकते असे मत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व

Yoga will live for 100 years! | योगा कराल, तर १०० वर्षे जगाल!

योगा कराल, तर १०० वर्षे जगाल!

Next

मोखाडा : आनंददायी आयुष्यासाठी योग फलदायी असून नित्यनियमाने योग करणारी व्यक्ती शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगू शकते असे मत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या योग शिबीरात शिव साधना योग ट्रस्टचे योगगुरु हरिश भोसले यांनी व्यक्त केले.
कला, विद्यान व वाणज्यि महाविद्यालय मोखाडा व शिव साधना योग ट्रस्ट नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ८ जानेवारी रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थांकरीता एक दिवसीय योग शिबिरांचे आयोजन केले होते यामध्ये २०० शिबीरार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शिबीरास संबोधीत करताना त्यांनी वर्तमानातील स्थितीतील योगाचे महत्व कथन केले दररोज आयुष्यात १५ मिनिटांचा वेळ काढून आपण आपल्या आयुष्यास योगाद्वारे तणावमुक्त बनवू शकतो. अलोम - विलोम, ओमकार, उच्चारण, कपलभाती, सूर्य नमस्कार, वमन, धौती व नेत्र स्थानाचे महत्व कथन करण्या बरोबरच त्यांचे सहकारी रवी मिश्रा, संतोष जगदाळे, संतोष बिहरा व भरत मढवी यांनी विविध आसनाद्वारे प्रात्यक्षिके करु न दाखविली अभ्यासातून येणारे ताण, मनाची एकाग्रता वाढविणे याकरीता करता येण्यासारख्या छोट्या गोष्टीही त्यांनी शिबीरार्थीना प्रात्यक्षिकाद्वारे दाखविल्या.
आजच्या धक्काधक्कीच्या तणावपूर्ण आयुष्यातील योगाचे महत्व ओळखून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मढवी यांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्यानी शिबिरार्थीशी संवाद साधून भूमिका कथन केली व उपस्थिताचे आभार मानले. या कार्यक्र माचे समन्वयक म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.भावे यांनी काम पाहीले तर कार्यालयीन सेवक ए.एच.पाटील व प्रा.गोजारे यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
(वार्ताहर)

Web Title: Yoga will live for 100 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.