वसई गावातील सुरुची बाग समुद्रात एक तरुण बुडाला; अन्य 5 जण बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 03:05 PM2020-09-07T15:05:15+5:302020-09-07T15:05:37+5:30
यातील अन्य 5 तरुणांना वाचवण्यात स्थनिक पोलीस व पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
वसई - वसई गावातील पाचूबंदर स्थित सुरुची बाग समुद्रकिनारी मौजमजेसाठी गेलेल्या सहा तरुणांपैकी एक तरुण बुडाला असल्याची दुर्देवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. यातील अन्य 5 तरुणांना वाचवण्यात स्थनिक पोलीस व पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
गणेश पांडुरंग खोत वय 19 रा.वसई पूर्व गोखीवरे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास म्हणजे 12 तासांनी हाती लागला असल्याचे वसई पोलिसांनी लोकमत ला सांगितले. वसई पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी दुपारी वसई पूर्वेतील सहा जणांचा एक ग्रुप वसईतील सुरुची बाग या समुद्रावर मौजमजेसाठी गेले असता तिथे हे सर्वजण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले,परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने यातील गणेश नावाचा तरुण समुद्रात बुडाला व तो वाहून गेला.
त्याचवेळी लागलीच स्थानिकांनी वसई पोलीस व अग्निशमन दलाला बोलवून अन्य पाच जणांना वाचवण्यात यश आले परंतु गणेश चा शोध सुरूच होता अखेर सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास गणेश चा मृतदेह मिळून आला. दरम्यान सर्वत्र कोरोना चे संकट असताना व धोकादायक धबधबा,समुद्र किनारे याठिकाणी प्रशासनाने बंदी घातली असताना देखिल तरुणाई ऐकत नाही त्यामुळे असे जीव गमवावे लागत आहेत.