पार्किंगच्या वादातून युवकाची केली हत्या; हाऊसिंग सोसायटीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 02:49 PM2020-04-12T14:49:12+5:302020-04-12T14:49:21+5:30

तिघांवर हत्येचा गुन्हा वसई पोलिसांत दाखल; संचारबंदी काळातील वसईतील दुसरी हत्या

Young man killed in parking lot; The shocking type of housing society in vasai | पार्किंगच्या वादातून युवकाची केली हत्या; हाऊसिंग सोसायटीतील धक्कादायक प्रकार

पार्किंगच्या वादातून युवकाची केली हत्या; हाऊसिंग सोसायटीतील धक्कादायक प्रकार

Next

वसई :मागील रविवारी माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  पं.दीनदयाळ नगरात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना ताजी असताना आता वसई पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अशीच एक घटना शनिवारी घडली आहे.
 
सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात संचारबंदी लागू आहे.  त्यातच प्रशासन वारंवार लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करते आहे. मात्र, वसईत आता पार्किंगच्या किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी वसई पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसईत किरकोळ वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. 
वसई कोर्ट च्या मागील बाजूस साईसृष्टी सोसायटीच्या परिसरात महेश बडगुजर (वय 40 ) हे आपली कार पार्किंग करत होते. 
त्यावेळी या कार पार्किंगच्या वादावरून सुभाष राठोड ,अंजना राठोड आणि  हेमंत चव्हाण यांच्यासोबत प्रथम बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

दरम्यान या तिघांनी मिळून महेश बडगुजर यांना अमानुष रित्या लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. परिणामी या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महेश बडगुजर यांना तातडीने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता पालिकेच्या डॉक्टरांनी या युवकास मृत घोषित केलं. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी सुभाष राठोड, अंजना राठोड आणि  हेमंत चव्हाण या तिघांना तात्काळ अटक केली असल्याचे वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत ला सांगितले.

Web Title: Young man killed in parking lot; The shocking type of housing society in vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.