‘योजनांच्या आधारे तरु णांनी उद्योजक बनावे’

By Admin | Published: February 22, 2017 05:49 AM2017-02-22T05:49:31+5:302017-02-22T05:49:31+5:30

केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घऊन संपूर्ण शासकीय यंत्रणा तुमच्या गावात आली आहे. योजनांचे विविध

'Young people should become entrepreneurs on the basis of schemes' | ‘योजनांच्या आधारे तरु णांनी उद्योजक बनावे’

‘योजनांच्या आधारे तरु णांनी उद्योजक बनावे’

googlenewsNext

तलासरी : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घऊन संपूर्ण शासकीय यंत्रणा तुमच्या गावात आली आहे. योजनांचे विविध स्टॉल्स लागले आहेत. त्यांची माहीती घेऊन प्रत्येकाने आपल्या फायद्याच्या योजनेचा शोध घेऊन त्याचा लाभ पदरात पाडून घ्यावा असे, आवाहन पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांनी केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय प्रचार संचालनालयातर्फे तलासरी तालुक्यातील गिरगांवात आयोजित विशेष प्रचार अभियानात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष सुरेखा थेतले, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, नवी दिल्ली तील क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या प्रधान महासंचालिका नीलम कपूर, महाराष्ट्र व गोवा विभागाच्या प्रभावती आकाशी, क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, तलासरीचे तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती धर्मा गोवारी, जि.प. सदस्य जयवंती ताई घोरखना, सुनिता शिंगडा, गीताताई धामोडे, पंचायत समिती सभापती वनशा दुमाडा, गट विकास अधिकारी राहुल धूम, पं.स. सदस्य प्रकाश सांबर, भाईलाल दुबळा, सुनिल निकुंभ, उर्मिला शिंगडे, संगिता ओझरे, सविता डावरे, सरपंच राजू डोलारे मुख्याध्यापिका शुभांगी खोत इत्यादी उपस्थित होते.
थेतले म्हणाल्या की, शासनातर्फे महिला सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून महिलांनी सक्षम होण्याची गरज आहे.
या वेळी आमदार पास्कल धनारे यांनी आदिवासी तरुणांनी कौशल्य विकास योजनेतून विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन बाहेरुन येणार लोंढा कमी होण्यास मदत होईल असे सांगितले. तळागाळातील लोकांसाठी सरकारच्या विविध योजना असून खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचा विकास करायचा असेल तर अशा विशेष कार्यक्रमांना उपस्थित राहून सरकारी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन नीलम कपूर यांनी केले.
या कार्यक्रमात मुकेश संखे व आर. के. नायर यांनी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार, स्टेट बँकेचे राहुल धनावडे यांनी कॅसलेस ट्रॅन्झॅक्शन व आर्थिक योजना तर कृषी विभागाचे विजय बोरकुड यांनी फळबाग लागवड या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तहसीलदार विशाल दौंडकर यांनी शासकीय योजनांची माहीती दिली. (वार्ताहर)

च्कार्यक्र मात क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे आयोजित विविध स्पर्धांची पारितोषिके वितरित करण्यात आलीत. आदिवासी नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते. विविध योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, भारतीय स्टेट बँक, पशुधन विभाग, कृषी विभाग, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान (उमेद), महाराष्ट्र ग्रामीण बँक, तहसील विभाग इत्यादींचे स्टॉल लावण्यात आले होते.

च्तसेच आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी गिरगांवातील माध्यमिक हायस्कूलपासून विद्यार्थ्यांची जनजागरण प्रभात फेरी तसेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या यशस्वीस्तेकरिता सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदिप पवार, विकास तापकीर, ग्राम विकास अधिकारी एस. आर. लोहार, शरद सादिगळे, गिरगांव माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका, आरोग्य कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.

Web Title: 'Young people should become entrepreneurs on the basis of schemes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.