कर्ज देतो सांगून तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 05:01 AM2019-11-14T05:01:23+5:302019-11-14T05:01:29+5:30
विरार पश्चिमेकडील कारगिलनगरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला फायनान्स कंपनीतून वैयिक्तक कर्ज देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
नालासोपारा : विरार पश्चिमेकडील कारगिलनगरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला फायनान्स कंपनीतून वैयिक्तक कर्ज देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विरार पूर्वेकडील मनवेलपाडा रोडवरील कारगिलनगरच्या गोकुळ नगरमधील सदनिका नंबर ११६ मध्ये राहणारा सुरेश गुडेकर (३५) याला १६ फेब्रुवारी २०१९ रोजी ११ च्या सुमारास आरोपी अंकितने मोबाइलवर फोन आपण बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.
सात लाख रूपयांचे वैयक्तिक कर्ज देतो असे सांगत त्याकरिता ५ टक्के रक्कम बँकेत भरण्यासाठी सांगून नंतर कर्जावर २ टक्के, बँक क्रेडिट, इन्श्युरन्स, तीन महिन्याचा अॅडव्हान्स इएमआय, क्रेडिट फंड, ट्रान्सफर फंड असे एकूण २ लाख ८८ हजार ३०० रु पये प्रदीप दुबे याच्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. अद्यापपर्यंत कर्जही नाही व दिलेले पैसेही परत केले नसून फसवणूक केली आहे.