वाचन प्रेरणा दिनानिमित्त युवाभरारीचा स्तुत्य उपक्रम
By admin | Published: October 16, 2015 01:42 AM2015-10-16T01:42:12+5:302015-10-16T01:42:12+5:30
बोईसर परिसरातील तरुण शिक्षक व मुख्याध्यापक यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या युवाभरारी या सामाजिक संस्थेने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात शिगाव
बोईसर : बोईसर परिसरातील तरुण शिक्षक व मुख्याध्यापक यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या युवाभरारी या सामाजिक संस्थेने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात शिगाव येथील जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांना बहुमूल्य अशी अवांतर माहितीची पुस्तके व चॉकलेट भेट स्वरूपात दिली.
वाचन प्रेरणा दिन हा शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे. परंतु, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये पुस्तकेच उपलब्ध नसल्याने ती मूळ वाचनापासून वंचित राहू नयेत, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशानेच आजचा प्रेरणा दिवस मुलांसोबत साजरा केल्याचे संस्थेचे सचिव सचिन देसाई यांनी सांगितले. तर, वाचन प्रेरणा दिन आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वर्षभर साजरा करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुशील शेजूने यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ संखे यांनी संस्थेचे आभार मानले तर कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष नितीन कांदे, सदस्य विकास करांडे, पंकज मिश्रा, रवी पाटील तसेच केंद्रप्रमुख दिलीप संखे, शाळा व्यवस्थापक अध्यक्षा गेडांबे मॅडम, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)