टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:51 AM2019-02-07T01:51:41+5:302019-02-07T01:52:28+5:30

संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत.

Yuva sena march on District Collectorate | टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Next

पालघर  - संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. तसेच, दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा, या मागणीसाठी मंगळवारी युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यांत मागील पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फक्त काही गावांतच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचा आरोप करत युवासेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो तहानलेल्या ग्रामस्थांनी, सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी जश्विन घरत, धनंजय मोहिते, राकेश पाटील, पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, उपसंपर्कप्रमुख केतन पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, ज्योती मेहेर, वैदेही वाढाण, परीक्षित पाटील, राहुल लोंढे, हेमंत धर्ममेहेर, सिद्धेश घरत आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात जव्हार, विक्रमगड, मोखाडा व वाडा या आदिवासी पट्ट्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हाधिकाºयांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा खाली गेल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त झालेला आहे. ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण चांगले असताना पाणी साठवण्यास शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत इथले पाणी शहराकडे पळवले जाते. ही वास्तवता आदित्य ठाकरे यांना कळल्यानंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सेना पदाधिकारी पोलिसांमध्ये बाचाबाची

मोर्चादरम्यान जिल्हाधिकाºयांना भेटणाºया शिष्टमंडळात फक्त पाच जणांना प्रवेश दिला जात असल्याचे आदेश असल्याने सेनेचे पदाधिकारी आणि सातपाटी सागरी पोलिसात बाचाबाची झाली. यावेळी कोकण विकास पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनाही आडवण्यात आले होते.
युवासेनेचा मोर्चा असताना युवा पदाधिकाºयांना डावलून सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यास गेल्याने युवांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबईला पाणी नेण्यात दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा तीव्र विरोध मोखाड्यातील कार्यक्र मातून हेतुपुरस्सर दूर ठेवण्यात आल्याने ते अत्यंत संतप्त झाले होते. माझ्या भागातील पाण्याशिवाय तुमचे महामुंबईचे स्वप्न साकार होतेच कसे, हे मी पाहतो, असा गर्भित इशारा त्यांनी दिला होता.

ज्या मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण प्रकल्पाचे पाणी मुंबईला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नेण्यात आले. त्याच मोखाड्यातील ७ गावे व १३ पाडे आज तहानेने व्याकूळ असल्याने टँकरचे पाणी पीत आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे पाणी मुंबईत नेले जाते, त्या गावांच्या तहानलेल्या लोकांसाठी सेनेने काय व्यवस्था केली, असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.

Web Title: Yuva sena march on District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.