जूचंद्रला तिवरांंची कत्तल

By Admin | Published: February 15, 2017 11:32 PM2017-02-15T23:32:24+5:302017-02-15T23:32:24+5:30

बेकायदेशीरपणे माती भराव करून तिवरांच्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात सुपर इंपे्नस कंपनीच्या तीन

Zachindra slaughter of Tivarans | जूचंद्रला तिवरांंची कत्तल

जूचंद्रला तिवरांंची कत्तल

googlenewsNext

वसई : बेकायदेशीरपणे माती भराव करून तिवरांच्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात सुपर इंपे्नस कंपनीच्या तीन भागीदारांविरोधात जूचंद्रचे तलाठी नामदेव धूम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जूचंद्र गावच्या हद्दीत मातीचा भराव करून तिवरांची कत्तल केल्याची तक्रार रतन उदय नाईक यांनी केल्यानंतर धूम यांनी पंचनामा करून माहिती घेतली होती. त्यानुसार सुपर इंपे्नस कंपनीने एक एकर जागेत माती भराव करून शंभरहून अधिक तिवरांची कत्तल केल्याचे उजेडात आले. पाहणीत तोडलेली तिवरे भरावाखाली गाडलेल्या व सुकलेल्या अवस्थेतील तिवरे आढळून आली. त्याचबरोबर भराव घालून सपाटीकरण केल्याची कबुली जेसीबी मालक हेमराज भोईर यांनी दिली होती.
या माहितीवरून धुम यांच्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाण्यात कंपनीचे भागिदार कांतीलाल मेहता, जयंती मेहता, राकेश मेहता यांच्याविरोधात भारतीय पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Zachindra slaughter of Tivarans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.