जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता तपासणी सुरू

By admin | Published: February 21, 2017 05:05 AM2017-02-21T05:05:29+5:302017-02-21T05:05:29+5:30

तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या २३६ शाळांतील शैक्षणिक सुविधांची तपासणी दुसऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्याकडून

Zilla Parishad schools have started the quality check | जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता तपासणी सुरू

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता तपासणी सुरू

Next

विकमगड : तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या २३६ शाळांतील शैक्षणिक सुविधांची तपासणी दुसऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्याकडून केली जात आहे. यामध्ये शाळेची पटसंख्या, उपस्थिती, शैक्षणिक साहित्याचे वाचन, पाठ्यपुस्तकांचे वाचन, शालेय पोषण आहाराचा दर्जा, भौतिक सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळा बाह्य मुलामुलींची संख्या इत्यादी बाबींची तपासणी होत आहे . ती पूर्ण झाली की, तिचा अहवाल वरीष्ठांना सादर केला जाणार आहे व त्यावर कार्यवाही होणार आहे.
तसेच ज्या शाळांची दुरूस्ती झाली आहे. ती कितपत सार्थ आहे. त्याचीही तपासणी सु्रु आहे. शाळेतील असुविधांमुळे विद्यार्थ्यांची गळती वाढत तर नाही ना, याचाही धांडोळा घेतला जात आहे. शिक्षणाचा अधिकार शासनाने मूलभूत जाहीर केला तरी आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळालेला नाही. तालुक्यात आज १८ ते २० हजार विद्यार्थी असतांना त्यांच्या गुणवत्तेत फारशी वाढ दिसून येत नाही. त्यामुळे ही तपासणी सुरू आहे सर्व शिक्षा अभियानावर लांखो रु पये खर्च केले असतांना गुणवत्ता वाढ का होत नाही? याचा विचार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Zilla Parishad schools have started the quality check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.