जिल्हा परिषदेच्या इंग्रजी शाळांबाबत संभ्रम कायम
By admin | Published: June 16, 2017 01:51 AM2017-06-16T01:51:06+5:302017-06-16T01:51:06+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मोफत इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी प्रायोगिक तत्वावर २०१० मध्ये नर्सरीचे व ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे इंग्रजी वर्ग सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड: जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मोफत इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी प्रायोगिक तत्वावर २०१० मध्ये नर्सरीचे व ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले. गेली ६ वर्षापासून या शाळांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली या संधीचा फायदा गरीब व गरजू विद्यार्थी घेत होते परंतु सन २०१५-१६ च्या लेखा परिक्षाणात या योजनेबाबत आक्षेप घेण्यात आल्याने हे वर्ग बंद करण्यात आवे अस आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील शाळांना दिला आहे. त्यामुळे गरीबाच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये असाचा उद्देश या शिक्षण विभागाचा आहे का असा सवाल पालकांनी केला आहे. हे वर्ग अचानक बंद झाल्याने या मुलांना मराठीतून शिक्षण घ्यावे लागेल किंवा महागडया शाळेत प्रवेश घ्यावे लागणार आहे त्यामुळे या शैक्षणिक वर्षात यावर उपाय करून हे वर्ग सुरूच ठेवावे अशी मागणी पालकांनी केली.
शासनस्तरावरची मान्यता नसल्याने लेखा परिक्षाणात आक्षेप घेतल्यामुळे हे वर्ग बंद करण्याचा निर्णय झाला असून तसा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
-भगवान मोकाशी, गटशिक्षणाधिकारी, विक्रमगड