जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची आबाळ

By Admin | Published: June 27, 2016 02:42 AM2016-06-27T02:42:33+5:302016-06-27T02:42:33+5:30

तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परिषद मराठी शाळा कार्यरत आहेत़ त्यामध्ये जवळपास २४ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असतात

Zip Schooling of the students | जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची आबाळ

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची आबाळ

googlenewsNext

राहुल वाडेकर,

विक्रमगड- विक्रमगड तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परिषद मराठी शाळा कार्यरत आहेत़ त्यामध्ये जवळपास २४ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असतात. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी,त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा,यासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी दिला जातो़ तसेच विद्यार्थ्यांची १०० टक्के पटनोंदणी करण्यासाठी शासनाकडून विदयार्थ्यांना गणवेश, पाठयपुस्तके व शाळेमध्ये पोषण आहराची व्यवस्था केली गेली आहे़ मात्र शाळा सुरु होऊनही आज ११ दिवस उलटून गेले असतांनाही विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आलेला नाही़ सद्यस्थित शाळांवरील शिक्षण आपल्या खिशातून पदरमोड करुन साहित्य विकत आणून आहार देत आहेत़
परंतु हे किती दिवस चालणार शाळा सुरु होतांच पोषण आहाराची सामुग्री देणे आवश्यक होते. पण ते झालेले नाही. ज्या ठिकाणी केंद्र शाळा आहेत़ त्यामध्ये पहिली ते ८ वी पर्यतच्या वर्गात जवळ जवळ ४०० ते ४५० विदयार्थी असतात़ एवढया मोठया विदयार्थ्यांना लागणाऱ्या पोषण आहाराचेसाहित्य खरेदी करीतांना येथील शिक्षकांना मोठी करसरतच करावी लागते आहे़ त्यातच शिक्षकांचे पगार महिन्याला वेळेत होत नसल्याची अडचण आहे़ त्यामुळे रोज पोषण आहार पुरविण्यासाठी लागणारे साहित्य घेण्याकरीता शिक्षकांना उसनवारी करावी लागत आहे़ ही संपूर्ण जबाबदारी येथील गट शिक्षणाधिकाऱ्यांची असून त्यांनी पोषण आहार सामग्रीसाठी निधीची तरतूद करणे गरजेचे आहे़
मात्र ते सारी जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे झाले आहेत़ त्यामुळे यामध्ये मरण होते ते शिक्षकांचे काही शाळा या खुप अडचणींच्या ठिकाणी व दुरवर असल्याने तेथे वाहतुकीची सोय नसल्याने तेथे े साहित्य नेणे देखील जिकिरीचे होत आहे़ शाळेवर पोषण आहार पुरवितांना शिक्षकांना आपल्या खिशाला चाट द्यावी लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे़
>अदयापही शासनाने शाळांना निधी दिलेला नसल्याने विदयार्थ्यानां पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. अगोदर वेळेत पगार नाही व आता पोषण आहारासाठी पैसे तरी कुठून आणावयाचे हा प्रश्न आहे.
- संजय तुकाराम आयरे,
नेते शिक्षक संघटना विक्रमगड.

Web Title: Zip Schooling of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.