जि.प. शिक्षकांची अनेक पदे मोखाड्यात रिक्त, ५ मुख्याध्यापक, २६ पदवीधर शिक्षक, ७ प्राथमिक शिक्षक अशी ३८ पदे रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:17 AM2017-09-22T03:17:47+5:302017-09-22T03:17:49+5:30
तालुक्यात पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ शाळा असून यामध्ये १९ मुख्याध्यापक, ५५ पदवीधर शिक्षक, ३५६ प्राथमिक शिक्षक असे एकूण ४३० जण कार्यरत आहेत. तर ५ मुख्याध्यापक, २६ पदवीधर शिक्षक, ७ प्राथमिक शिक्षक अशी ३८ पदे रिक्त आहेत.
रविंद्र साळवे
मोखाडा : तालुक्यात पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ शाळा असून यामध्ये १९ मुख्याध्यापक, ५५ पदवीधर शिक्षक, ३५६ प्राथमिक शिक्षक असे एकूण ४३० जण कार्यरत आहेत. तर ५ मुख्याध्यापक, २६ पदवीधर शिक्षक, ७ प्राथमिक शिक्षक अशी ३८ पदे रिक्त आहेत.
मोठ्या प्रमाणात शिक्षकाची पदे रिक्त असल्यामुळे आदिवासी दुर्गम असलेल्या मोखाडा तालुक्यांत शिक्षण घेणाºया आदिवासी मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यामध्ये गंभीर बाब अशी कि कमी पटसंख्या असणा-या शाळांमध्ये अधिक शिक्षक कार्यरत आहेत तर जास्त पट संख्या असणा-या शाळांमध्ये कमी शिक्षक आहेत. परंतु याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. कमी पटसंख्या असतांना जास्त शिक्षक कार्यरत तर जास्त पटसंख्या असतांना कमी शिक्षक असा विरोधाभास संपूर्ण तालुक्याभरात दिसून येत आहे. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. ग्रामीण भागात २५ पटसंख्या असल्यास दोन शिक्षक तर ५० पट असल्यास किती शिक्षक? त्याचप्रमाणे दहा ते पंधरा मुलांची पट संख्या असलेल्या शाळाचे समायोजन देखील तितकेच महत्वाचे आहे तसेच दांडी बहादर, लेट लतिफ शिक्षकाची संख्या देखील दिवसागणीक वाढत असूनही वरिष्ठांकडून दांडी बहादर अथवा लेटलतिफ शिक्षकांवर कारवाई झाल्याचे उदाहरण सुध्दा दुर्मिळच आहे.