एक कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त!
By admin | Published: March 18, 2017 03:07 AM2017-03-18T03:07:13+5:302017-03-18T03:07:13+5:30
वाशिम नगर परिषद; चार दिवसातील कारवाई.
वाशिम, दि. १७- ज्या नागरिकांकडे थकीत कर होते अशा थकीतदारांची मालमत्ता जप्ती करण्याची मोहीम वाशिम नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत आहे. १४ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत चार दिवसात १ कोटी ९६ लाख ११ हजार ३९४ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. नगर परिषदेतील कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम दिवशी १४ मार्च रोजी १0 जणांची ५४ लाख रुपयांची मालमत्ता , १५ मार्च रोजी २२ लाख रुपयांची, १६ मार्च रोजी १७ लाख ९७ हजार व १७ मार्च रोजी चौथ्या दिवशी २२ लाख ११ हजार अशी जवळपास १ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. १७ मार्च रोजी थकीत करधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली यामध्ये विष्णू नारायण इंगोले २८४४0, रामराव उत्तमराव वाकुडकर २६२२७३, जोगेदंग सिंग दयालसिंग सचदेव २३८५४१, परशराम देवजी काळे १९१0१२, मायादेवी सुरेशचंद्र लाहोटी १६४३५५, लिलाराम कल्याणदास बसंतवाणी १५४९७१, सुमन तुळशीराम काळे १४७0४४, नागोराव अर्जुनराव काळे १४२0२६, भगवान दत्ताराव वाकुडकर १२७३१५, जनाबाई काळे ११२३५७, लक्ष्मण बळीराम दिग्रसकर/ देवीदास दिग्रसकर १0२0७८, ललिताबाई राजकुमार / अकोट अर्बन बँक वाशिम ९४६३१ रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. सदर मालमत्ता जप्तीची कार्यवाही मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशानुसार कर निरीक्षक अ. अजीज अ. सत्तार, सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, दत्तात्रय देशपांडे, केशव खोटे, नाजीमोद्दीन मुल्लाजी, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मनोज इंगळे, कुणाल कनोजे, मुन्ना खान यांनी केली.