वाशिम जिल्ह्यातील १.६७ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचे दोन हजार

By दिनेश पठाडे | Published: June 12, 2024 03:40 PM2024-06-12T15:40:36+5:302024-06-12T15:42:17+5:30

ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना १७ वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा

1 Lakh 67 thousand farmers of Washim district will get 2000 under PM Kisan Yojana | वाशिम जिल्ह्यातील १.६७ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचे दोन हजार

वाशिम जिल्ह्यातील १.६७ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचे दोन हजार

दिनेश पठाडे, वाशिम : पंतप्रधान पदाचा नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतला आहे. पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता वितरित करण्यासाठी त्यांनी निधीला मंजुरी दिली असून हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार १३८ शेतकऱ्यांना या हप्त्याचे २ हजार मिळणार आहेत.

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळतात. एका आर्थिक वर्षात एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात वर्ग केला जातो. यापूर्वी योजनेचा १६ वा हप्ता २८ फेब्रुवारीला मिळाला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १७ वा हप्ता वर्ग करता आला नाही. आता केंद्र शासनाने निधी वितरणास मंजुरी दिली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा होणार आहेत. हा हप्ता मिळण्यासाठी केवायसी, आधार सिडिंग पूर्ण केलेल्या पात्र शेतकरी लाभार्थींची अंतिम यादी तयार केले जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल, अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे.
---
..तर ६ हजारांवर शेतकरी लाभास मुकणार
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या १ लाख ७३ हजार ८८० शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी ११ आतापर्यंत १ लाख ६७ हजार १३८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून अद्याप ६ हजार ७४२ शेतकऱ्यांची केवायसी शिल्लक राहिली आहे. १७ व्या हप्त्यापूर्वी यादी क्लोज होण्यापूर्वी केवायसी न केल्यास अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही.

Web Title: 1 Lakh 67 thousand farmers of Washim district will get 2000 under PM Kisan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.