चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी
By नंदकिशोर नारे | Updated: October 8, 2022 13:59 IST2022-10-08T13:56:05+5:302022-10-08T13:59:32+5:30
Nashik Accident : यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे बाेलल्या जात आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी
नंदकिशोर नारे / वाशिम
वाशिम : औरंगाबाद राेडवरील हाॅटेल मिरची चाैकात चिंतामणी ट्रव्हल्स बस आणि टॅंकरच्या झालेल्या अपघातात वाशिम जिल्हयातील १० प्रवाशांची नाेंद आहे. यामध्ये वाशिम येथून ६ तर मालेगाव येथून ४ प्रवासी बसल्याची नाेंद आहे. परंतु यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे बाेलल्या जात आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या यवतमाळ कार्यालयामधील तिकीट बुकींगच्या यादीनुसार वाशिम येथून गाडीत बसलेले लांडगे पती - पत्नी, सी.पी. भागडे, अमित, निकिता राठाेड, राठाेड तर मालेगाव येथून गाडीत बसलेले शिव केनवड, शहा सर, शहा अशा १० जणांचा समावेश आहे. तसेच ईतरही काही प्रवासी मालेगाव येथून बसले असल्याचे बाेलल्या जात आहे. लक्झरी बसमध्ये असलेल्या अनेकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुणाचा भ्रमणध्वनी बंद तर काहींचा नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर आढळून आला. यामधे वाशिम येथून बसलेल्या प्रभा केशव जाधव यांचा पायाला दुखापत झाली असून त्या नाशिक येथे उपचार घेत आहेत.
नाशिक येथील जिल्हा हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये वाशिम जिल्हयातील भगवान श्रीपाद मनाेहर,प्रभादेवी केशव जाधव, आर्यन गायकवाड, पूजा गायकवाड, साहेबराव जाधव , अंबादार वाघमारे, किरण चाैगुले, अनिता सुखदेव चाैगुले, महादेव धाेत्रे या प्रवाशांचा समावेश आहे.