स्काउट परीक्षेचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:47+5:302021-05-05T05:07:47+5:30

जिल्हा क्रीडा संकुल वाशीम येथे कोरोनाच्या महामारितही स्काउट मास्तर बी.एच. आघाव यांनी स्वतः व आपल्या स्काउट विद्यार्थ्यांकडून ९ ते ...

100% Result of Scout Exam | स्काउट परीक्षेचा १०० टक्के निकाल

स्काउट परीक्षेचा १०० टक्के निकाल

Next

जिल्हा क्रीडा संकुल वाशीम येथे कोरोनाच्या महामारितही स्काउट मास्तर बी.एच. आघाव यांनी स्वतः व आपल्या स्काउट विद्यार्थ्यांकडून ९ ते १२ फेब्रुवारी, २०२१ दरम्यान विविध प्रात्यक्षिके, तोंडी, लेखी परीक्षा दिल्या होत्या. यामध्ये श्री सखाराम महाराज विद्यालय लोणीचे सखाराम महाराज स्काउट पथकाचे सहा विद्यार्थी बसले होते. ते सहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी महामारीच्या काळात शंभर टक्के उत्तीर्णचे पत्र शाळेला प्राप्त झाले. पात्र विद्यार्थ्यांमध्ये दीपक शंकर बोडखे, प्रथमेश तेजराव सोनुने, रोहित समाधान इंगोले, चेतन भगवान क्षीरसागर, वेदांत पंढरीनाथ बोडखे व मयूर सुनील सानप यांचा समावेश आहे. गेल्या १७ वर्षांपासून या शाळेचे स्काउटचे विद्यार्थी या परीक्षेला बसतात, तसेच शंभर टक्के निकालासह उत्तीर्ण होतात. या विद्यार्थ्यांना शाळेचे सचिव डॉ.सखाराम जोशी, शाळेचे अध्यक्ष गोविंद जोशी, संस्थाचालक सुधाकरराव पाठक, शाळेचे संस्थाचालक तथा प्राचार्य कल्याण जोशी, शाळेचे स्काउट शिक्षक बी.एच. आघाव, विज्ञान शिक्षक जयंत वसमतकर, रिसोड येथील डॉ.हेमंत नरवाडे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: 100% Result of Scout Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.