तीन महिन्यांत आढळले १० हजार कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:24+5:302021-04-04T04:42:24+5:30

जिल्ह्यात १ जानेवारी २०२० रोजी कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ६७२ होता. १ फेब्रुवारी रोजी तो ४८२ ...

10,000 corona infected patients were found in three months | तीन महिन्यांत आढळले १० हजार कोरोना बाधित रुग्ण

तीन महिन्यांत आढळले १० हजार कोरोना बाधित रुग्ण

Next

जिल्ह्यात १ जानेवारी २०२० रोजी कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ६७२ होता. १ फेब्रुवारी रोजी तो ४८२ ने वाढून ७ हजार १५४ झाला; मात्र १ मार्च रोजी हा आकडा तब्बल १ हजार ९१६ ने वाढून ९ हजार ७० झाला; तर १ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत ७ हजार ३२८ ने वाढून १६ हजार ३९८ झाला, तसेच २ व ३ एप्रिल या दोन दिवसांत ६२४ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, ३ एप्रिलअखेर बाधितांचा एकूण आकडा १६ हजार ६९९ वर पोहोचला आहे. बाधितांचा दैनंदिन आकडा ३०० पेक्षा अधिकच असून, त्यात घट होणे अशक्य झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाभरात कलम १४४ लागू असून, सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू आहे. दुसरीकडे चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणालादेखील सुरुवात करण्यात आल्याने कोरोना संकटाचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

.................

अशी वाढत गेली बाधितांची संख्या

१ नोव्हेंबर २०२० - ५७११

१ डिसेंबर २०२० - ६१८४

१ जानेवारी २०२१ - ६६७२

१ फेब्रुवारी २०२१ - ७१५४

१ मार्च २०२१ - ९०७०

१ एप्रिल २०२१ - १६३९८

................

बॉक्स :

‘नो मास्क’ची अंमलबजावणी; लाखोंचा दंड वसूल

कोरोना विषाणू संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तोंडाला नेहमी मास्क वापरणे आवश्यक ठरत आहे. प्रशासनाने या नियमाची चोख अंमलबजावणी सुरू केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या माध्यमातून गेल्या काही दिवसांत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे असताना आजही अनेक नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे.

..................

४६८ रुग्ण संस्थात्मक; तर २१९० रुग्ण गृह विलगीकरणात

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने काही खासगी रुग्णालयेही अधिग्रहीत केली आहेत. दरम्यान, ३ एप्रिलअखेर संस्थात्मक विलगीकरणात ४६८; तर गृह विलगीकरणात २१९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...................

उपलब्ध बेड्स व भरती रुग्णांची सद्य:स्थिती

सर्वसाधारण बेड्स ११३८/३७१

ऑक्सिजन बेड्स ३७७/८८

व्हेंटिलेटर बेड्स ४३/०९

Web Title: 10,000 corona infected patients were found in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.