१०,८९७ वीजग्राहकांकडे १०.२२ कोटी थकीत, कसा चालणार महावितरणचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:42+5:302021-07-28T04:43:42+5:30

कोविड-१९ चे कारण समोर करत वीज बिल भरण्याकडे काही ग्राहक मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटातून जावे ...

10.22 crore due to 10,897 consumers, how will MSEDCL run its affairs? | १०,८९७ वीजग्राहकांकडे १०.२२ कोटी थकीत, कसा चालणार महावितरणचा कारभार

१०,८९७ वीजग्राहकांकडे १०.२२ कोटी थकीत, कसा चालणार महावितरणचा कारभार

Next

कोविड-१९ चे कारण समोर करत वीज बिल भरण्याकडे काही ग्राहक मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत वीज ग्राहकांना वीजबिल वसुलीसाठी कोणताही तगादा न लावता अखंडित सेवा देण्यात आली. तथापि, परिस्थिती सुधारूनही थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची तसदी ग्राहकांनी घेतली नाही. वाशिम जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून १०,८९७ वीजग्राहकांनी थकीत देयकातील कवडीचाही भरणा केलेला नाही. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी या सर्व ग्राहकांना तत्काळ वीज बिल भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या १९ हजार ८९७ ग्राहकांव्यतिरिक्त २३७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे १.३७ कोटी रुपयांची देयके थकीत आहेत.

----------------------

वीजपुरवठ्यावर परिणामाची शक्यता

वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जाचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागविणे अशक्य होत आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी थकबाकी अदा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

----------------------

अकोला मंडळात ७२ हजार ग्राहकांकडे ६६ कोटी

महावितरणच्या अकोला परिमंडळात नोव्हेंबर २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ७२ हजार ग्राहकांकडे ६६ कोटींची थकबाकी आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील १०,८९७ ग्राहकांकडे १० कोटी २२ लाखांच्या थकबाकीसह अकोला जिल्ह्यातील २४,२३३ ग्राहक असून त्यांच्याकडे २४ कोटी २२ लाख रुपये थकीत आहेत, तर बुुलडाणा जिल्ह्यातील ३६,८४३ ग्राहकांकडे ३१ कोटी ६१ लाख थकीत आहेत.

----------------------

तालुकानिहाय ग्राहक आणि थकीत रक्कम

तालुका - ग्राहक - थकबाकी (कोटी)

कारंजा - २,०४१ - १.७०

मालेगाव - ९६६ - ०.८५

मं.पीर - ४०५ - ०.३१

मानोरा - १,४४१ - ०.८७

रिसोड - ३,५९२ - ३.३८

वाशिम - २,७५२ - ३.१३

-----------------------

वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक

तालुका ग्राहक

कारंजा - १४५

मालेगाव - १५०

मं.पीर - ५४

मानोरा - १२२

रिसोड - २७२

वाशिम - १९४

----------------

Web Title: 10.22 crore due to 10,897 consumers, how will MSEDCL run its affairs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.