नेत्र तपासणी शिबिराचा १०३ जणांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:21+5:302021-07-01T04:27:21+5:30
तपासणी केलेल्या १०३ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींना मोतीबिंदू आढळून आला आहे. या शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू निदान ...
तपासणी केलेल्या १०३ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींना मोतीबिंदू आढळून आला आहे. या शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू निदान चाचणी घेण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते रुग्णांची तपासणी करण्यात आली होती.
सदर शिबिर हे कोविड १९च्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आले, तसेच कोरोनामुळे म्युकरमायक्रोसिस या डोळ्यासंबंधित आजाराविषयी माहिती येथील नागरिकांना देण्यात आली .
या शिबिरामध्ये डॉ.पवार, डॉ.महेश चव्हाण, प्रीती रोकडे, अश्विनी गव्हाणे यांनी रुगणांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले, तसेच ज्या तेरा रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला, त्यांना पुढील उपचार घेण्याचे सुचविले आहे.
यावेळी या शिबिरामध्ये पिंप्री मोडक येथील सरपंच, तंटामुक्ती सदस्य, ग्राम सदस्य व सर्व गावकरी उपस्थित होते, यावेळी आशिष राठोड, अनुभव चव्हाण, नरेंद्र जाधव आदींची उपस्थिती हाेती.