१0४ लाभार्थींना गॅस सिलेंडरचा लाभ !
By admin | Published: June 9, 2017 01:21 AM2017-06-09T01:21:02+5:302017-06-09T01:21:02+5:30
संयुक्त वनव्यवस्थापक समिती व वनविभागातर्फे तालुक्यातील दुर्गम भागातील १0४ लाभार्थींना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : संयुक्त वन व्यवस्थापक समिती व वनविभागातर्फे तालुक्यातील दुर्गम भागातील १0४ लाभार्थींना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यात आला.
दुर्गम भागात महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. लाकडाच्या धुरामुळे बर्याच स्त्रियांना दमाचा व डोळ्याचा आजार होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी जंगलातील लाकुड तोडु नये या उद्देशातून वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे पात्र लाभार्थींना गॅस सिलिंडरचे मोफत वाटप केले जाते. किन्हीराजा परिसरातील १0४ लाभार्थींना याचा लाभ देण्यात आला. आमदार अमित झनक यांच्याहस्ते या लाभार्थींंना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. संयुक्त वनव्यवस्थापक समिती, किन्हीराज, कवरदरी, अमनवाडी, उमरदरी, येथील १0४ लाभार्थींना गॅस जोडणीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, किन्हीराजाचे सरपंच वेणुबाई जामकर, डॉ.जगदीश घुगे, उत्तमराव नाईक, विनायकराव कुटे, पं.स.सदस्य संजय पवार, भिकाराव घुगे, गणोदे, वैजनाथआप्पा गोंडाळ, वनक्षेत्र अधिकारी राऊत, भिसे, राठोड, इरतकर, गॅस एजन्सीचे संचालक प्रविण पाटील, पं.स.सदस्य गजानन गिर्हे, संजय डिवरे, उपसरपंच नंदु जयस्वाल, उ परोक्त गावाचे सर्व सरपंच, संयुक्त वनसमितीचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते.