१0४ ‘रिचार्ज पीट’च्या माध्यमातून जलसमृद्धी

By admin | Published: September 29, 2016 01:24 AM2016-09-29T01:24:53+5:302016-09-29T01:24:53+5:30

वाशिम जिल्हा प्रशासनाने घेतली दखल; दोडकी येथे लोकसहभागातून जलसंधारणाची कामे.

104 Water Resources through Recharge Peat | १0४ ‘रिचार्ज पीट’च्या माध्यमातून जलसमृद्धी

१0४ ‘रिचार्ज पीट’च्या माध्यमातून जलसमृद्धी

Next

वाशिम, दि. २८-वाळकी-दोडकी येथे स्वयंसेवी संघटनेचा फंड आणि लोकसहभागातून १0४ ह्यरिचार्ज पीटह्ण निर्माण करण्यात आले. या रिचार्ज पीटच्या माध्यमातून शेतकरी जलसमृद्धी साधत असून, या कामाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. बुधवारी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी या जलसंधारणाच्या कामांना भेट देऊन पाहणी केली.
शेतातील पाणी शेतात मुरविण्यासाठी र्चिाज पीट बसविण्यात आले आहेत. कमी खर्चात सदर नवे तंत्र वाळकी दोडकी शिवारात साकारण्यात आले आहे. या परिसरात एकूण १0४ रिचार्ज पीट निर्माण झाल्याने जलपातळीत वाढ झाल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे. मध्यंतरी पावसाने दीर्घ खंड दिला होता. या दरम्यान शेतकर्‍यांनी या रिचार्ज पीटच्या माध्यमातून पिकांना सिंचन केले आहे. १0४ रिचार्ज पीटच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लिटर पाणी भुगर्भात मुरविण्यात आल्याचा दावा कृषी तज्ज्ञांनी केला. या कामाची पाहणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे बुधवारी या शिवारात पोहोचले. यावेळी प्रगतशील शेतकरी सुभाष नानवटे यांनी जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. यावेळी सरपंच अशोक भुसारी, गजानन ठाकरे, महाळे, संतोष डव्हळे, कडूजी देवढे, सुरेश भुसारी, गजानन भुसारी, संजय वाघ, विठ्ठल मोरे आदी शेतकरी उपस्थित होते.

गावकरी, शेतकर्‍यांच्या लोकसहभागातून वाळकी-दोडकी येथे मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली. कधीकाळी पाणीटंचाईग्रस्त असलेले सदर गाव आता जलसमृद्ध होत आहे. या परिसरात १0४ रिचार्ज पीट निर्माण करण्यात आले. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे.
- सुभाष नानवटे,
प्रगतशील शेतकरी दोडकी.

Web Title: 104 Water Resources through Recharge Peat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.