वाशिम जिल्ह्यात आणखी १०५ पॉझिटिव्ह; १२१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:17 AM2020-09-28T10:17:35+5:302020-09-28T10:17:42+5:30
१२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १०५जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ४१२२ वर पोहचली. १२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. रविवारी दिवसभरात १०५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील २ , सुभाष चौक येथील २, सिव्हिल लाईन येथील ४, शुक्रवार पेठ येथील ४, लाखाळा येथील ४, आययुडीपी परिसर २, गणेशपेठ येथील ५, महात्मा फुले चौक परिसर २, योजना कॉलनी परिसर २, शिवाजी नगर येथील १, देवपेठ येथील १, पोलीस वसाहत परिसर २, गुरुवार बाजार येथील १, लक्झरी बस स्टँड परिसर ३, जुनी नगरपरिषद परिसर १, विनायक नगर येथील १, काळे फाईल येथील २, कारागृह परिसरातील ७, घोटा येथील ५, टो येथील ५, आसरा पार्डी येथील ५, शिरपुटी येथील १, वाकद येथील १, शेलगाव येथील ३, केकतउमरा येथील ७, तोंडगाव येथील १, आसोला जहांगीर येथील १, मालेगाव शहरातील ७, डव्हा येथील २, राजुरा येथील १, रिसोड शहरातील धोबी गल्ली येथील ४, सिव्हिल लाईन येथील १, अनंत कॉलनी येथील १, लोणी फाटा येथील १, निजामपूर येथील १, कोयाळी येथील २, करडा येथील १, केनवड येथील २, देगाव येथील २, मोरगव्हाण येथील १, गोवर्धन येथील १, लोणी येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील घोटा येथील १, कारंजा लाड तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील १ अशा एकूण १०५ जणांचा समावेश आहे.
आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४१२२ वर पोहोचली असून, त्यातील ८३ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ३३३५ लोक बरे झाले. दरम्यान, रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना खासगी कोविड हॉस्पीटल व सरकारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.