ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारामुळे १०६ कुटुंबे घरकुल योजनेतून अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:44 AM2021-07-28T04:44:08+5:302021-07-28T04:44:08+5:30

धनज बु. : येथूनच जवळ असलेल्या गट ग्रामपंचायत भिवरी, नागलवाडी आणि आंबोडा या गावातील पंतप्रधान आवास ...

106 families disqualified from Gharkul Yojana due to mismanagement of Gram Sevak | ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारामुळे १०६ कुटुंबे घरकुल योजनेतून अपात्र

ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारामुळे १०६ कुटुंबे घरकुल योजनेतून अपात्र

Next

धनज बु. : येथूनच जवळ असलेल्या गट ग्रामपंचायत भिवरी, नागलवाडी आणि आंबोडा या गावातील पंतप्रधान आवास योजना अंतर्गत नमुना ड मधील यादी वगळण्यात आल्याने १०६ कुटुंबे या योजनेतून अपात्र करण्यात आली आहेत.

भिवरी, आंबोडा, नागलवाडी येथील ११९ कुटुंबीयांची यादी ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत होती. परंतु ग्रामसेवक सतीश आर. मांजरे यांच्या भोंगळ कारभारामुळे फक्त १३ कुटुंबीय या योजनेसाठी पात्र झाले असून १०६ कुटुंबे चुकीच्या सर्व्हेमुळे अपात्र घोषित करण्यात आली आहेत.

पात्र कुटुंबीयांची माहिती चुकीची देण्यात आल्याने ते कुटुंबीय अपात्र घोषित करण्यात आले आहेत. तरी याबाबत संबंधित ग्रामसेवक सतीश मांजरे व संबंधितांवर कारवाई करण्यात येऊन अपात्र घोषित करण्यात आलेल्या कुटुंबीयांना पात्र करण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.

मी आंबोडा येथील रहिवासी असून पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत पात्र कुटुंबीयधारक आहे. परंतु ग्रामसेवकाच्या चुकीच्या सर्व्हेमुळे मला या योजनेत अपात्र घोषित करण्यात आले आहे.

- पंजाब ढगे, आंबोडा

मी या योजनेसाठी पात्र असूनसुद्धा ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे मला या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

जितेंद्र सोळंके, भिवरी

Web Title: 106 families disqualified from Gharkul Yojana due to mismanagement of Gram Sevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.