ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारामुळे १०६ कुटुंब घरकुल योजनेतून अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:39+5:302021-07-29T04:40:39+5:30
भिवरी , आंबोडा, नागलवाडी येथील ११९ कुटुंबीयांची यादी ही पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यात येत होती. परंतु ग्रामसेवक सतीश ...
भिवरी , आंबोडा, नागलवाडी येथील ११९ कुटुंबीयांची यादी ही पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यात येत होती. परंतु ग्रामसेवक सतीश आर. मांजरे यांच्या भोंगळ कारभारामुळे फक्त १३ कुटुंबीय या योजनेसाठी पात्र झाले असून, १०६ कुटुंब हे चुकीच्या सर्व्हेमुळे अपात्र घोषित करण्यात आली आहेत. पात्र कुटुंबीयांची माहिती चुकीची देण्यात आल्याने ती कुटुंब अपात्र घोषित करण्यात आली आहेत. याबाबत ग्रामसेवक सतीश मांजरे व संबधितांवर कारवाई करण्यात येऊन अपात्र घोषित करण्यात आलेल्या कुटुंबीयांना पात्र करण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.
मी आंबोडा येथील रहिवासी असून पंतप्रधान आवास योजनेंर्तगत पात्र कुटुंबधारक आहे. परंतु ग्रामसेवकाच्या चुकीच्या सर्व्हेमुळे मला या योजनेत अपात्र घोषित करण्यात आले आहे.
पंजाब ढगे, आंबोडा
मी या योजनेसाठी पात्र असूनसुद्धा ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे मला या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
जितेंद्र सोळंके, भिवरी